एलईडी मासेमारीमुळे जेलीफिश किनार्‍यावर?

202 Viewed Raigad Times Team 0 respond

मच्छिमारांसह पर्यटकांना धोका

। रायगड टाइम्स ।
उरण । बेकायदा एलईडी मासेमारीविरोधात उरणमधील मच्छिमारांचे आंदोलन सुरू असतानाच, अशा समुद्रात सोडण्यात येणार्‍या उच्च दाबाच्या विजेच्या दिव्यांमुळे आकर्षित होऊन जेलीफिश किनार्‍यावर येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे किनार्‍यावर मासेमारी करणार्‍यांना त्यांचा त्रास होत आहे. मच्छीमारांसह किनार्‍यावरील रहिवाशांनाही धोका वाढला आहे. शासनाचे दुर्लक्ष मात्र कायम आहे.
समुद्रात मासेमारी करण्यासाठी 2 ते 3 हजार वॅटचे दिवे लावले जात आहेत. या दिव्यांमुळे खाण्यायोग्य माशांबरोबरच समुद्रातील धोकादायक व विषारी जेलीफिशही मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. या माशांच्या काट्यामुळे इजा होण्याचा धोका असतो. सामान्यपणे खोल समुद्रातच असलेले हे जेलफीश सध्या किनार्‍यालगतही दिसू लागले आहेत. त्यामुळे रात्री-अपरात्री मासेमारी करणार्‍यांना याचा धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती करंजा येथील मच्छीमार विनायक पाटील यांनी दिली. आधीच बेकायदा मासेमारीमुळे व्यवसाय धोक्यात आला असताना जेलीफिशमुळे आणखी एक संकट मासेमारांवर ओढवले आहे, असे त्यांनी सांगितले.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

खांदा वसाहतीत जेष्ठांकरीता विरंगुळा केंद्र

गच्चीवर ओल्या कचर्‍यापासून गांडूळ निर्मिती

Related posts
Your comment?
Leave a Reply