घारापुरी बेट आज उजळणार

145 Viewed Raigad Times Team 0 respond

पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

। रायगड टाइम्स ।
मुंबई । देशाच्या इतिहासात प्रथमच समुद्र तळाखालून सर्वात लांब केबल टाकून विद्युतीकरण करण्यात आलेल्या घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाचा लोकार्पण सोहळा आज गुरुवार, दि.22 फेब्रुवारीला सायं. 6 वाजता घारापुरी बेटावर (शेतबंदर) येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ.श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार आहेत.

युनेस्को मान्यता प्राप्त जागतिक वारसा लाभलेले घारापुरी बेट हे महत्वाचे पर्यटनस्थळ आहे. घारापुरी बेट पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत असून यापूर्वी बेटावर पर्यटन विकास महामंडळातर्फे डिझेल विद्युत जनित्राव्दारे वीज पुरवठा करण्यात येत होता. मात्र महावितरणच्या भांडुप परिमंडळामार्फत एमएमआरडीएच्या आर्थिक सहायाने समुद्रातळाअंतर्गत 95 चौ.मी.मीची 7.5 कि.मी.लांबीची 22 केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनी टाकून बेटास वीजपुरवठा करण्यात आला आहे.
राज्यात पहील्यांदाच इतक्या लांबीची वीजवाहीनी समुद्रतळातून टाकण्यात आली आहे. महावितरण या भागात वीज पोहोचविण्यात यशस्वी झाले असून या बेटावरील शेतबंदर, राजबंदर, मोराबंदर या तीनही गावी 2 00 के.व्हीचे रोहीत्र महावितरणतर्फे लावण्यात आली आहेत. 70 वर्षानंतर प्रथमच या बेटावर वीज पोहोचली असून याकामी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने कामास गती मिळाली. तसेच उर्जामंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत विशेष लक्ष दिले. तर महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली इतर अधिकार्‍यांनी हा प्रकल्प पूर्ण केला. घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाकरता केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागाच्या परवानग्या मिळाल्यानंतर प्रत्यक्षात…

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

गच्चीवर ओल्या कचर्‍यापासून गांडूळ निर्मिती

Related posts
Your comment?
Leave a Reply