कोकण मराठी साहित्य परिषदेच्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

unnamed

सुशील मालवी, मानव टेमकर प्रथम

महाड | वार्ताहर | कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पंधराव्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. खुल्या गटात महाड तालुक्यातील मांडले येथील सुशील मालवी यांना तर महाविद्यालयीन गटामध्ये अलिबाग तालुक्यातील कमळपाडा येथील मानव टेमकर यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याची माहिती स्पर्धा समितीच्या प्रमुख मंगल गांधी यांनी दिली.
खुल्या गटातील निबंध स्पर्धेसाठी एकूण ५५ निबंध प्राप्त झाले तर महाविद्यालयीन गटामध्ये २९ निबंध प्राप्त झाले होते. खुल्या गटामध्ये सुशील मालवी यांनी प्रथम प्राप्त केला. महाड येथील प्रदीप राजाराम पवार यांना द्वितीय क्रमांक, पाली ता.सुधागड येथील दत्तात्रेय अंबिके यांना तृतीय क्रमांक विजय खंडेराव सूर्यवंशी आणि विनय केशव कर्ले ( निजामपूर रोड, माणगांव) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली आहेत.
महाविद्यालयीन गटामध्ये मानव टेमकर याला प्रथम क्रमांक मिळाला. द्वितीय क्रमांक सुंदरराव मोरे महाविद्यालयाचा विद्यार्थी अभिषेक सोमण आणि महाड येथील विद्यार्थी मयूर पटेल या दोघांना विभागून देण्यात आला आहे. रेश्मा नंदकुमार पाटील (सिद्धेश्‍वर रोड वाडा ता.ठाणे) हिला तृतीय क्रमांक तर श्रेया पाटकर (सुंदरराव मोरे महाविद्यालय पोलादपूर) आणि प्राजक्ता राजाराम पाटील (को.ए.सो.दगडूशेठ पार्टे उच्च महाविद्यालय, महाड) या दोघींना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे.
घोषवाक्य स्पर्धेमध्ये ६६ स्पर्धक तर छायाचित्र स्पर्धेत १५ स्पर्धेक सहभागी झाले असल्याची माहिती मंगल गांधी यांनी दिली. कोकण मराठी परिषदेच्या, महाड येथील साहित्य संमेलनात स्पर्धा समिती प्रमुख म्हणून काम करीत असताना आपल्याला अत्यंत आनंददायी अनुभव आल्याचे मंगल गांधी यांनी सांगितले.

Tagged with:    

About the author /


Related Articles

Post your comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Rasik Hardware, Alibag