कर्तव्य दक्षता व शिस्तप्रियता यातून चांगले व्यक्तिमत्व साकारते – सरोज गवस

701 Viewed Raigad Times Team 0 respond
Photo0061 (1)

फणसाड अभयारण्य विभागातर्फे वनक्षेत्रपाल सी.एन. गावंड, ए.एस.भालेराव व डी.ए. सातपुते यांना भावपूर्ण निरोप

कोलई । वार्ताहर । सेवेत कार्यरत असताना कर्तव्य दक्षता व शिस्त प्रियता महत्वाची असून त्यामुळे चांगले व्यक्तिमत्व साकारले जाते. असे भावपूर्ण उद्गार फणसाड वन्यजीव अभयारण्याच्या वनसंरक्षक सरोज गवस यांनी मुरुड तालुक्यातील सुपेगांव फणसाड अभयारण्य येथे आयोजित निरोप समारंभप्रसंगी काढले.
फणसाड अभयारण्याविभागाचे वनक्षेत्रपाल सी.एन. गावंड यांची नुकतीच ठाणे-मांडवी येथे तर लिपीक ए.एस. भालेराव, वनरक्षक डी.ए. सातपुते यांची बदली झाल्याने त्यांना भावपूर्ण निरोप देण्यासाठी फणसाड अभयारण्यात वनसंरक्षक सरोज गवस यांच्या अध्यक्षतेसाठी नुकताच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कर्तव्यदक्ष मनमिळावू स्वभाव असलेले वनक्षेत्रपाल सी.एन. गावंड यांनी गेली साडेतीन वर्षे फणसाड अभयारण्यातील सेवेत अभयारण्यातील अवैध वृक्षतोड, छुप्या शिकारींना पायबंद, वणवे प्रतिबंध, वनसंपदा राखण्यात उत्तम प्रकारे चोख कामगिरी केली आहे. तसेच भालेराव व सातपूते यांनीदेखील येथील सेवेत उत्तम प्रकारे काम केले असल्याचा उल्लेेख गवस यांनी केला.
फणसाड अभयारण्याचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारलेले कर्नाळा अभयारण्याचे एस.के. पवार यांच्यासह सर्व कर्मचारी, वनमजूर, महिला बचत गटाचे पदाधिकारी व सदस्य आवर्जून उपस्थित होते. वनक्षेत्रपाल सी.एन. गावंड यांनी फणसाड अभयारण्यात आपल्या कारकिर्दीमध्ये परिसरातील चार गावामध्ये संयुक्त व समित्या स्थापन केल्या. सुपेगांव येथे ग्रामपरिस्थितीकिय समितीमार्फत दोन महिला बचत गटाची स्थापना व त्यांंच्यामार्फत पर्यटकांना भोजन-नास्टा, बचत गटामार्फत पर्यटकांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात उत्तमप्रकारे कामगिरी केली असून येथील पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येेते आहे.

News Feed
Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.
29_Karadi_Samaj

कराडी समाज मुरुड विद्यार्थी गुणगौरव संपन्न

fansad dam

नादुरुस्त वॉलमुळे फणसाड धरण कोरडे!

Related posts
Your comment?
Leave a Reply