मुरुड नागपरिषदेची नालेसफाई संथ गतीने

776 Viewed Raigad Times Team 0 respond
murud nalesafai
  • कोळीवाडा येथील मुख्य नाल्यात घाणीचे साम्राज्य
  • नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मुरुड । वार्ताहर । मुरुड नगरपरिषदेचे शहरातील नालेसफाईचे काम संथ गतीने सुरु आहे. कोळीवाडा येथील मुख्य नाल्यात घाणीचे साम्राज्य पसरले असून स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आहे. बाजारपेठ, गोलबंगला मार्गावरील मार्‍ेयांचे कामही रखडल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
पावसाळा तोंडावर येवून ठेपला असताना नगरपरिषद प्रशासन मात्र सुस्त असल्याचे दिसत आहे. पावसाळा तोंडावर येवून ठेपला तरी शहरातील नालेसफाई अपूर्णावस्थेत असल्याचे चित्र दिसत आहे. मुख्य बाजारपेठ, भंडारवाडा, कोळीवाडा, मसालगल्ली परिसरातील नालेसफाई अजूनही झालेली नाही. कोळीवाडा माडी दुकानाशेजारील मुख्य नाला घाणीने भरल्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. या नाल्यातील पाणी समुद्राला जाऊन मिळते. या मार्गावर वाळू आल्याने हा नाला तुंबुन दुर्गंधी येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांना डास व दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.
या नाल्यातून बाजारपेठ, कोळीवाडा, अंजुमन हायस्कूल परिसरातील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून येते. जर या नाल्याची स्वच्छता केली नाही तर पावसात या परिसरात पाणी तुंबण्याची भीती आहे. येथे राहणारे उदय पेटकर यांनी नगपरिषदेत वारंवार तक्रार केली आहे. तरी आरोग्य निरीक्षक राकेश पाटील यांनी केवळ स्वच्छतेचे आश्वासन दिले. यासंदर्भात राजेश पाटील यांची भेट घेवून विचारणा केली असता त्यांनी हे नाले स्वच्छ केल्याचा दावा केला. या नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांचा हा दावा खोटा असल्याचे दिसून आले आहे.
त्याचबरोबर बाजारपेठेतून गोलबंगला मार्गे जुनी पेठ मुख्य मार्गावर साईप्रसाद बेकरी व लाल बंगला परिसरातील दोन मोर्‍यांचे काम रखडल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या मार्गावरील हे काम लवकरात लवकर पूर्ण करुन नगरपरिषदेने वाहतुकीचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी वाहन चालक करीत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना सबनीस आळी, गावदेवी पाखाडी असा उलट प्रवास करून तेलवडे, शीघ्रे, आगरदांडा असा प्रवास करावा लागत आहे तो वाचेल.

News Feed
Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.
fansad dam

नादुरुस्त वॉलमुळे फणसाड धरण कोरडे!

lavni

पावसाच्या भरवशावर…

Related posts
Your comment?
Leave a Reply