खानाव ग्रामपंचायत आयएसओ दर्जा कायम टिकविणार – अनंत गोंधळीगावातील विविध विकासकामांचे उद्घाटन

993 Viewed Raigad Times Team 0 respond
  • गावातील विविध विकासकामांचे उद्घाटन

अलिबाग । वार्ताहर । पहिले आयएसओ प्रमाणपत्र ग्रामपंचायत खानावला मिळाल्याने आमचा लोकांसाठी काम करण्याचा उत्साह आणखी वाढला आहे. आयएसओ प्रमाणपत्र हे लोकांना दिल्या जाणार्‍या सोयीसुविधांसाठी मिळत असल्याने हा दर्जा कायम टिकविण्याचा प्रयत्न आम्ही करून असे प्रतिपादन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी केेले.
सोमवारी (दि.8) खानाव ग्रामपंचायत हद्दीतील मूळ खानाव गावामध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे उद्घाटन अनंत गोंधळी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. तालुक्यातील अन्य ग्रामपंचातींनीही खानावप्रमाणे आयएसओ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. गावाचा विकास करताना ती कोणत्या पक्षाच्या ताब्यात आहे हे महत्वाचे नसून लोकांपर्यंत शासनाच्या किती योजना, सोयी सुविधा पोहचल्या जातात हे महत्वाचे असल्याचे मतही गोंधळी यांनी यावेळी मांडले.
यावेळी सरपंच जितेंद्र गोंधळी, उपसरपंच रुपाली शिंदे, सदस्य नारायण शिंदे, ज्योत्स्ना गायकर, रसिका शिंदे, राजेंद्र म्हात्रे,अनिता चव्हाण, सुरेखा पाटील, नंदकुमार शिपाई, किशोर वार्डे, गिता म्हात्रे व ग्रामसेवक ए.व्ही. कदम यांचेसह जगन्नाथ गायकर, पांडूरंग भोपी, नारायण पाडेकर, नंदकुमार पाटील, सुनिल शिंदे, नरेश कर्णेकर, वैभव भोइर, राजेश भोपी, सुरेश कर्णेकर, विश्वास भोपी, दत्तात्रेय भोईर, लक्ष्मण जाधव, उमेश गायकर, वासुदेव शिवलकर, जगदिश शिंदे, हरेश कर्णेकर, मंगेश कर्णेकर, प्रशांत भोईर, वामन गायकर, कल्पेश भोपी, संजय शिंदे, रविंद्र पाडेकर व मुळखानाव ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

News Feed
Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

जिल्हा क्रीडा संकुल टँकर भरोसे

दहावीतही ‘कोकण-कन्या’ सुस्साट

Related posts
Your comment?
Leave a Reply