दहावीतही ‘कोकण-कन्या’ सुस्साट

1363 Viewed Raigad Times Team 0 respond

राज्याचा निकाल 91.46 टक्के

पुणे । वृत्तसंस्था । राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल सोमवारी (दि.8) ऑनलाईन जाहीर झाला आहे. राज्यातील 91.46 टक्के विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणातील हा शेवटचा टप्पा यशस्वीपणे पार केला असून आजवरचा हा सर्वोत्तम निकाल आहे. बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही कोकण विभागातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून यंदाही मुलींनी मुलांना मागे टाकले आहे. यावर्षी राज्यभरातून 17 लाख 32 हजार 898 विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती. त्यापैकी 91.46 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी दहावीचा निकाल 88.32 टक्के लागला होता. त्यात यंदा 3.14 टक्क्यांची वाढ झाली आहे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 90.18 टक्के असून 92.24 टक्के मुली यशस्वी झाल्यात. 21 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे, तर 4,731 शाळांमधील सर्वच्या सर्व विद्यार्थी पास झाले आहेत.


अलिबाग । प्रतिनिधी । राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या दहावी परिक्षेचा निकाल सोमवारी (दि.8) दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. करिअरला कलाटणी देणारा बारावीचा हा टप्पा जिल्ह्यातील 93.50 टक्के विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या पार केला. जिल्ह्यातून 38 हजार 154 विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. त्यापैकी 35 हजार 674 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे गतवर्षीप्रमाणे यंदाही निकालात ‘रायगडच्या मुलीच हुशार’ ठरल्या आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 94.59 टक्के असून 92.48 टक्के मुलगे ही परिक्षा उत्तीर्ण झालेत.उत्तीर्ण झालेल्या 35 हजार 674 विद्यार्थ्यांपैकी 7 हजार 110 विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली. 12 हजार 448 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 12 हजार 572 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेत.

निकालात मुरुडची बाजी;
सुधागडचा निकाल सर्वात कमी
जिल्ह्यात मुरुड तालुक्याचा निकाल सर्वाधिक 96.54 टक्के लागला. त्याखालोखाल पोलादपूर 95.88 टक्के, पेण 95.17 टक्के, माणगाव 94.94 टक्के, उरण 94.71 टक्के, पनवेलचा निकाल 94.52 टक्के लागला आहे. सर्वात कमी 89.40 टक्के निकाल सुधागडचा लागला आहे.


रायगडच्या मुली हुश्शार!

sscजिल्ह्यातून एकूण 38 हजार 154 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यात 19 हजार 645 मुलांचा तर 18 हजार 509 मुलींचा समावेश होता. परिक्षेला बसलेल्या  एकूण मुलांपैकी 18 हजार 167 मुलगे उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.48 टक्के आहे. तर 18 हजार 509 मुलींपैकी 17 हजार 507 मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण होण्याचे हे प्रमाण 94.59 टक्के आहे.  या निकालावरुन यंदाही रायगडात दहावीच्या परिक्षेत मुलीच अव्वल ठरल्या आहेत.

News Feed
Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

खानाव ग्रामपंचायत आयएसओ दर्जा कायम टिकविणार – अनंत गोंधळीगावातील विविध विकासकामांचे उद्घाटन

रेवदंंड्यात विद्युत खांबांची टांगती तलवार

Related posts
Your comment?
Leave a Reply