दुसरीत शिकणार्‍या मुलावर पाच जणांकडून अनैसर्गिक अत्याचार

1408 Viewed Raigad Times 0 respond

चिमुकला आयसीयूमध्ये दाखल

पुणे । वृत्तसंस्था । पुण्यात दुसरीत शिकणार्‍या मुलावर पाच जणांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या चिमुकल्यावर खासगी रुग्णालयात आयसीयूमधून उपचार सुरु आहेत.
ही घटना वारजेमधील सिद्धेश्वर नगरमध्ये गुरुवारी रात्री आठ ते दहाच्या सुमारास दरम्यान घडली. पीडित मुलाचे वडील महावितरणमध्ये अधिकारी आहेत.
पीडित मुलगा त्याच्या घराजवळ खेळत असताना, पाच जण त्याला वारजे परिसरातील दगड खाणीत घेऊन गेले आणि त्याच्यावर अत्याचार केला.
या प्रकरणातील पाच आरोपींपैकी दोन जण नितीन भंडारे (वय 21 वर्ष) आणि रवी पवार (23 वर्ष) हे सज्ञान असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर तीन आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

आता ‘डिजिटल इंडिया’ 12 भाषांत

सत्तेसाठी असंगाशी संग करू नका!

Related posts
Your comment?
Leave a Reply