नमिता नाईक यांचे निधन

2389 Viewed Raigad Times Team 0 respond

अलिबागवर शोककळा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा नमिता नाईक यांचे उपचार सुरु असतानाच पुण्यातील रुबी रुग्णालयात शनिवारी 18 जुलै 2015 रोजी सकाळी निधन झाले. त्या 41 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त सकाळपासूनच सोशल मिडियाद्वारे संपूर्ण रायगडात वार्‍यासारखे पसरले. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पार्थिव शनिवारी सायंकाळच्या सुमारास पुणे येथून अलिबाग येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारो चाहत्यांनी तसेच शेकापक्षासह सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यांच्या पार्थिवावर येथील अमरधाम स्मशानभुमीवर पती प्रशांत नाईक यांनी अंत्यसंस्कार केले. यावेळी अनेकांच्या भावना अनावर झाल्या होत्या. शोकसागरात बुडालेल्या नमिता नाईक यांना अलिबाग करांनी साश्रु नयनांनी निरोप दिला.
Namita Naikयावेळी शेकापक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, आ. पंडित पाटील, सुप्रिया पाटील, चित्रलेखा पाटील, भावना पाटील, सुनंदा पाटील, अ‍ॅड राजन पाटील, अ‍ॅड निता पाटील यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक क्षेत्राातील मान्यवर उपस्थित होते.
दि. 2 जुलै रोजी पुणे परिसरातील बोरघाटात त्यांच्या कारचा अपघात झाला होता. पुणे-मुंबई मार्गावरील दस्तुरी गावाच्या हद्दीत अमृतांजन पुलाजवळून गुरुवारी माजी नगराध्यक्षा एम.एच.06. बी.एन 8100 या मर्सिडिज कारने जात असताना एम.एच.04 एफ.एस. 3631 या टेम्पोने त्यांच्या कारला मागुन धडक दिली. यामध्ये माजी नगराध्यक्षा नमिता नाईक व चालक दिपक यांना दुखापत झाली. त्यांना प्रथम निगडी येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढिल उपचाराकरीता पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असल्याने त्यांची 17 दिवस मृत्यूशी लढाई सुरु होती. मात्र अखेर त्यांनी मृत्यूला आपलेसे करीत नाईक आणि देशमुख आणि पाटील परिवारासह संपूर्ण अलिबागकरांना अखेरचा लाल सलाम केला. त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच अलिबागकरांसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.

News Feed
Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

विद्यार्थ्याची आत्महत्या!

अलिबागची अस्मिता हरपली…

Related posts
Your comment?
Leave a Reply