एक्सप्रेस वेवरील दरडी काढण्याचे काम संथगतीने

652 Viewed Raigad Times 0 respond
express highway

 वेळेत काम पूर्ण होण्याची शक्यता कमी

बांधकाम मंत्री एकनाथ खडसे यांनी केली पाहणी

खालापूर । वार्ताहर । मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील धोकादायक दरडी काढण्याचे काम 24 जुलै पासून सुरू करण्यात आले आहे. हे काम संथगतीने सुरू असल्याने काम पुर्ण होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. काम सुरू असल्यामुळे एक्सप्रेसवेवरील वाहतुक जुन्या मार्गावर वळविली जात असल्याने होत असलेली वाहतुक कोंडी सोमवारीही कायम होती. दरम्यान बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देवून कामाची पाहणी केली.
खंडाळा व आडोशी बोगद्या जवळ दरडी कोसळल्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाने धोकादायक दरडी हटविण्याचे काम 24 जुलै पासून सुरू केले आहे. हे काम 10 दिवसात पुर्ण करण्याचा प्रयत्न असला तरी काम संथगतीने सुरू असल्यामुळे काम पुर्ण व्हायला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेशातील मेटाफेरी या कंपनीचे 14 जणांचे विशेष पथक धोकादायक दरडी व सैल झालेले दगड काढण्याचे काम करत आहे. त्यांना स्पेन येथील चार तज्ञ मार्गदर्शन करत आहेत. शिवाय राज्य रस्ते विकास महामंडळाचे अनेक वरिष्ठ अधिकारी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहुन मार्गदर्शन करत आहेत. आय.आर.बी.चे असंख्य कर्मचारी व यंत्रणा या कामात गुंतली आहे. मात्र कामाची प्रगती संथगतीने सुरू असल्याने ठरलेल्या वेळेत हे काम पुर्ण होण्याची शक्यता फार कमी आहे.
काम सुरू असताना वाहतुक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळविण्यात येत आहे. हा रस्ता अरूंद असल्याने गेली 4 दिवस प्रचंड वाहतुक कोंडी होत आहे. याचा फटका हजारो प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे काम लवकर पुर्ण करण्याची मागणी होत आहे. काम सुरू असताना उडालेला दगड लागून आयआरबीचा एक कर्मचारी जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली असून जखमी कामगारावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कामाच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडत असल्याने काम करताना अडचणी येत आहेत. शिवाय पावसामुळे तयार होणारे धुकेही कामात अडथळा आणत आहे. संथगतीने काम सुरू असल्यामुळे सदर काम वेळेत पुर्ण होण्याची शक्यता कमी आहे.
—————————–
एक्सप्रेसवेची निर्मिती होण्यापुर्वी मुंबई व पुण्याला जाणारी वाहने बोरघाटातील अवघड टप्पे पार करत मार्गस्थ होत होती. बोरघाटात एखादे वाहन बंद पडले तर वाहनांच्या लांबलचक रांगा लागत होत्या. एक्सप्रेसवेची निर्मिती झाल्यानंतर मात्र तुरळक वाहनेच जुन्या मार्गाने जात होती. गेल्या चार दिवसापासून खोपोलीकर जुने दिवस आठवू लागले आहेत. बोरघाटाचा अवघड टप्पा पार करताना अनेक वाहने बंद पडत असल्याने वाहनांची दुरूस्ती करणार्या फिटरना चांगले दिवस आले आहेत. शिवाय मके, चिंक्की, काकडी, वडापाव, पाण्याच्या बाटल्या व अन्य वस्तुंची विक्री करताना अनेक तरूण जुन्या रस्त्यावर पहायला मिळत आहेत. त्यामुळे आपण 15 वर्ष मागे गेल्याची प्रतिक्रीया अनेक जेष्ठ खोपोलीकर व्यक्त करताना दिसत आहेत.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.
article-2288581-18751DAC000005DC-258_634x614

जमिनीचा पैसा नि पैशांचा पाऊस

may marathi bhasha

माय मराठी झाली राजभाषा

Related posts
Your comment?
Leave a Reply