नांदगाव येथील जानकी-रामचंद्र सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन

976 Viewed Raigad Times Team 0 respond

मुरुड । वार्ताहर । मुरुड तालुक्यातील छत्रपती शिवाजी नुतन विद्यालय यशवंतनगर नांदगाव येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जानकी-रामचंद्र सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन नांदगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहर रामचंद्र चौलकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी माजी मुख्याध्यापीका मेघा कुलकर्णी, संचालक-कृष्णा अंबाजी, अरविंद भंडारी, गणेश गाणार, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष केदार गद्रे, निजामुद्दीन अनवारे, अहमद कारभारी, भाजपा तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर आदी मान्यवर उपस्थित होते. मनोहर चौलकर यांनी आपले आई वडिल राचमंद्र चौलकर व आई जानकी चौलकर यांच्या स्मरणार्थ दिलेल्या भरघोस आर्थिक सहाय्यातून हे सभागृह परिपूर्ण करण्यात आले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना, सहाय्यक शिक्षक उदय खोत म्हणाले की चौलकर यांच्या बहुमुल्य मदतीमुळेच हे सभागृह पूर्ण झाले. त्यांच्या या मदतीबद्दल शाळा त्यांची सदैव ॠणी राहील. यावेळी सहजीवन विद्या मंडळाचे चेअरमन फैरोज घलटे यांच्या हस्ते मनोहर चौलकर यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून गौरवण्यात आले. तर त्यांच्या सौभाग्यवती मनोरमा यांचा सत्कार मुख्याध्यापक आरती बांदोडकर यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्ष फैरोज घलटे यांनी नाना चौलकर यांचे सहकार्य शाळेस वेळोवेळी मिळत असते. त्यांनी त्यांची कृपादृष्टी या शाळेवर ठेवावी असे म्हटले.
यावेळी या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

News Feed
Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

श्रीवर्धनकर मिलिंदची दमदार कामगिरी

संगणकीय ज्ञान घेऊन प्रगती साधा

Related posts
Your comment?
Leave a Reply