संगणकीय ज्ञान घेऊन प्रगती साधा

938 Viewed Raigad Times Team 0 respond
  • अनिल शिंदे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

कोर्लई । वार्ताहर । आजच्या संगणकीय युगात शिक्षकवृंदांनी विशेष लक्ष पुरवून विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञानाचा पुरेपूर लाभ मिळवून द्यावा. विद्यार्थ्यांनी देखील संगणकीय ज्ञान घेऊन आपली प्रगती साधावी असे आवाहन विचार समितीचे अध्यक्ष अनिल शिंदे यांनी केले.
मुंबई येथील आगरदांडा बौध्द सेवा मंडळ तसेच बौध्दजन पंचायत समितीची विभागीय शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रा.जि.प.च्या आगरदांडा प्राथमिक शाळेला संगणक भेट देण्यात आला. यावेळी शिंदे बोलत होते. कार्यक्रमास शिवसेनेचे उपतालुका प्रमुख ॠषिकांत डोंगरीकर, आगरदांडा बौध्द महामंडळ अध्यक्ष अनिल शिंदे व त्याचे सहकारी, बौध्दजन पंचायत समितीचे उपाध्यक्ष दिपक तांबे, भंडारी समाज अध्यक्ष प्रविण खोत, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिषा डोंगरीकर, ग्रामपंचायत सदस्या प्राजक्ता तोडणकर, नम्रता हेदूलकर, केंद्रप्रमुख पाटील, मुख्याध्यापक बालाजी वडवळे शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळेला बौध्दजन पंचायत समितीने संगणक भेट दिल्याबाबत ॠषिकांत डोंगरीकर यांनी समाधान व्यक्त केले. शाळेच्या उन्नतीसाठी सर्वांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले. यावेळी प्रविण खोत, मुख्याध्यापक वडवळे यांनीही विचार मांडले.

News Feed
Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
5/5 - 1
You need login to vote.

नांदगाव येथील जानकी-रामचंद्र सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन

आगरदांडा भंडारी समाजाचा पारंपारिक गोविंदा

Related posts
Your comment?
Leave a Reply