स्वदेस फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, सायकलींचे वाटप

872 Viewed Raigad Times Team 0 respond
swades12 (1)

जिल्ह्यातील सव्वातीन हजार विद्यार्थ्यांना लाभ

अलिबाग । प्रतिनिधी । स्वदेस फाऊंडेशनचे संस्थापक विश्‍वस्त रॉनी स्कू्रवाला व झरीना स्कू्रवाला यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील 1250 विद्यार्थ्यांना स्वाधार स्कॉलरशिप देण्यात आली. तर 1900 विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.
दुर्गम भागातील मुलांनी नियमित शाळेत जावे, त्यांच्या गळतीचे प्रमाण थांबावे हा यामागचा हेतू आहे. 1200 विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी तर 50 विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण पूर्ण करून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देण्यात आली आहे. ही स्वाधार स्कॉलरशिप टाटा ट्रस्ट यांच्या सहयोगाने देण्यात आली. पुरार येथील इंग्रजी माध्यम शाळेच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनी हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रथम रॉनी स्क्रूवाला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वदेस फाऊंडेशन रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात 2400 शाळांमध्ये शैक्षणिक विकासाचे काम करीत आहे. 3 हजार मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे हा स्वदेसचा हेतू असून त्याअनुषंगाने स्वदेस विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास विविध उपक्रमांच्या माध्यमातून करीत आहे.
स्वदेस फाऊंडेशनच्या स्वाधार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सबळ करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर इतर मुलांनीही निराधार मुलांचा आधार देवून सबळ केले पाहिजे, असे आवाहन रॉनी स्क्रू वाला यांनी केले. झरीना स्क्रू वाला यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वदेस प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी स्वदेस चिफ ऑपरेटींग ऑॅफीसर प्रविण अग्रवाल, संचालक अमेय दबली, प्रिया नायर, प्रकल्प अधिकारी तुषार इनामदार आदिंसह स्वदेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

News Feed
Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.
august-16-ad-mahesh-mohite-

अलिबाग भाजपतर्फे आदिवासीबांधवांना अवजारे वाटप

corporal punishment-3

विद्यार्थ्याला लाकडी रुळांनी मारहाण

Related posts
Your comment?
Leave a Reply