सेक्स रॅकेट, बनावट पोलीस आणि 69 बकरे; 9 जण अटकेत

1839 Viewed Raigad Times 0 respond

नागपूर । वृत्तसंस्था । नागपूरमध्ये सेक्स रॅकेट चालवणार्‍या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या दोघांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 69 जणांना गंडा घातला आहे. गंडा घालण्याची पद्धत एखाद्या सिनेमात शोभणारी आहे. नागपूर पोलिसांच्या अटकेत असलेल्या दोघांनी तब्बल 69 जणांना गंडा घातला आहे. गंडा घालण्याची पद्धतही एखाद्या फिल्मच्या स्टोरी सारखीच आहे.
वरवटकर जोडी उच्चभ्रू वसाहतीमध्ये सेक्स रॅकेट चालवायची. परराज्यातून पोरी आणायच्या. सधन कुटुंबातल्या पुरुषांना आकर्षित करायचे. एखादा बकरा जाळ्यात आला की आपणच नकली पोलीस बनायचे आणि छापा टाकायचा. पण एकदा खर्‍या पोलिसांची रेड पडली आणि इतरांना बकरा बनवणारे स्वतःचा बकरा बनले.
आरोपी वरवटकरच्या घरातून पोलिसांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. इतकेच नाही, तर हा पठ्ठ्या निवृत्त लष्करी सैनिक असल्याचेही समोर आले आहे.
कधी लाख, तर कधी दोन लाख, कधी कधी पाच लाख. गेल्या दीड वर्षात या 9 जणांच्या टोळीने कोट्यवधींची माया कमावली. गाड्या, बंगले खरेदी केले. या प्रकरणाच्या तपासात काही धक्कादायक बाबी ही समोर आल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्या 9 आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार नकली छापे मारताना या काही खरे पोलिसही मदत करायचे.
आता गंमत अशी आहे, की या टोळक्याकडून फसवणूक झालेले पीडितही अब्रूनुकसानीच्या कारणाने समोर यायला मागत नाही.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.
prev-next.jpg

जामा मशीदीत घरफोडी

सोशलसाईट ट्विटरवर आता भारतीय महिला राज?

Related posts
Your comment?
Leave a Reply