पुण्यात आता दिवसाआड पाणी सोडणार

612 Viewed Raigad Times 0 respond

पावसाअभावी निर्णय

चार धरणात केवळ 14 टीएमसी पाणी

पुणे । वृत्तसंस्था । पावसाने ओढ दिल्याने शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणातील पाणीसाठा कमी झाला असून, पाणी कपातीचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी बैठकीत घेतला आहे. सोमवारपासून (ता. 7) शहरात एकदिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. कमी पावसामुळे पुणेकरांवर पाणीकपातीची नामुष्की ओढावली आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱया चार धरणांमध्ये 14 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. शिवाय, पावसानेही दांडी मारली आहे. दर महिन्याला पाणीकपातीसंदर्भात आढावा बैठक घेतली जाणार आहे. शिवाय, पाणीचोरी टाळण्यासाठी भरारी पथके स्थापण्यात येणार आहेत, अशी घोषणा बापट यांनी केली.
पुणे शहर आणि परिसरात पावसाने हुलकावणी दिल्याने शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणातील पाणी कमी झाले आहे. सध्या 14 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. सप्टेंबर महिना सुरू झाला आला तरी पावसाची चिन्हे नाहीत. त्यामुळे पुणेकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे बांधकामांना पिण्याचे पाणी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीतच पाणीकपातीचा निर्णय घेण्यास बगल देऊन ‘आणखी पंधरा दिवस वाट पाहू’, अशी भूमिका पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतली होती. तर महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या गैरहजेरीत पाणीकपातीचा निर्णय घेणे महापालिका प्रशासनाने टाळले होते. पाऊस नसल्याने कमी होत असलेल्या पाणीसाठ्याचे नियोजन न केल्यास पुढील जुलैपर्यंत पुणेकरांना पाणी पिण्यासाठीही पुरणार नाही असे चित्र होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलत पाणी कपात करावी, अशी मागणी शहरातील संस्था, संघटना तसेच नागरीकांकडूनच होत होती.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

गावे अंधारात, ‘डिजिटल’ कसा होणार?

शीनाला मारण्याचे एक कारण नाही-इंद्राणी

Related posts
Your comment?
Leave a Reply