जैन पर्युषण काळात आठवडाभर मटणबंदी!

700 Viewed Raigad Times 0 respond

मिरा-भाईंदर पालिकेने घेतला वादग्रस्त निर्णय

ठाणे । वृत्तसंस्था । मीरा-भाईंदर महापालिका हद्दीत जैन धर्मियांच्या पर्युषण काळात आठ दिवस कत्तलखाने तसेच मटणविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सत्ताधारी भाजपने तसा ठरावच पालिका सभागृहात संमत करून घेतला आहे.
पर्युषण काळात दोन दिवस मटण विक्री बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनेच 2007 मध्ये घेतलेला आहे. मात्र मीरा-भाईंदर महापालिकेने त्यापुढचे पाऊल टाकले आहे. पालिकेच्या हद्दीत एकूण साडेआठ लाख एवढी लोकसंख्या असून त्यात जैनांची संख्या सव्वा लाख आहे. सत्ताधारी भाजपच्या निर्णयाने हा जैन समाज मात्र सुखावला आहे.
यंदा 10 ते 28 सप्टेंबर हा जैन पर्युषण काळ असणार आहे. यात 11 ते 18 सप्टेंबर दरम्यान जैन श्वेतांबरांचा उपवास असणार आहे तर 18 ते 27 सप्टेंबर दरम्यान जैन दिगंबर उपवास धरणा आहेत. हे लक्षात घेता पर्युषण काळात पालिका हद्दीत मटण विक्रीवर बंदी घालण्यात यावी, अशा मागणीचा ठराव नगरसेवक दिनेश जैन यांनी महासभेत मांडला होता. या ठरावावर मतदान घेण्यात आले असता ठराव 29 मतांनी संमत झाला. या ठरावात मटणविक्री बंदीचा नेमका काळ नमूद करण्यात आलेला नसला तरी आठ दिवस ही बंदी असेल असे सांगण्यात आले.
‘शहरात जैन धर्मियांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय योग्यच आहे. राज्य सरकारने दोन दिवस ही बंदी आधीपासूनच घातलेली आहे. त्यात केवह सहा दिवसांची भर पालिकेने टाकली आहे. पालिकेने आपल्या अधिकारांचा वापर करूनच हा निर्णय घेतला आहे, असे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितले. काँग्रेसचे अश्रफ शेख आणि सुहास रक्वी यांनी या बंदीवर आक्षेप घेतला. या न्यायाने रमजानमध्येही महिनाभर दारूबंदी केली पाहिजे, अशी मागणी शेख यांनी केली तर ही बंदी घटनाविरोधी आणि अन्य धार्मियांवर अन्याय करणारी आहे असा आरोप रक्वी यांनी केला. शिवसेनेचे जयंतीलाल पटेल यांनी अशा बंदीने दोन धर्मांमध्ये तेढ वाढेल, अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेने केला ठरावाला विरोध
भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनेने या प्रस्तावाला विरोध केला. शिवसेनेने ठरावाच्या विरोधात मतदान केले. सेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही साथ लाभली; मात्र सेनेचे प्रभाकर दळवी, हरिश्‍चंद्र आमगावकर, प्रभाकर म्हात्रे, शुभांगी कोथियन हे चार नगरसेवक मतदानावेळी गैरहजर राहिल्याने हा ठराव जिंकण्यात भाजपाला यश आहे.
दरम्यान, राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या वर्षी बीफबंदीचा निर्णय घेतल्याने मोठे वादळ उठले होते. त्यानंतर आता भाजपाच्याच अधिपत्याखाली असलेल्या मुंबईच्या सीमेवरील पालिकेत तब्बल आठ दिवस मटणविक्रीवर बंदी घालण्यात आल्याने त्यावरून मोठा गहजब माजण्याची शक्यता आहे.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

व्हीआरएस घेतलेल्या सैनिकांनाही ओआरओपी

Related posts
Your comment?
Leave a Reply