डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यावर नेहा वैद्य यांची पीएचडी

7283 Viewed Raigad Times 1 respond

विद्यावाचस्पती नावाने निर्माण केला प्रबंध

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची मान्यता

मुरुड । वार्ताहर । आध्यत्म आणि भक्ती मार्ग यांचा शिक्षणाशी संबंध आधुनिक युगात कठीण वाटतो. किंबहुना आपण आपले पुरोगामीत्व सिध्द करायला देवधर्म चालीरिती यांच्याशी फटकून रहावे हा अनाकलनीय शिरस्ता जणू बनला आहे. पण ठाण्यातील नेहा मिलिंद वैद्य यांनी या नव्या वैचारिक परंपरेला छेद देण्याचे कार्य करून दाखवले आहे. त्यांनी चक्क डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या अध्यत्मिक प्रसाराचा सार पकडून विद्यावाचस्पती नावाचा प्रबंध तयार केला. या प्रबंधाला टिळक महाराष्ट्र विद्यालयाने मान्य करून नेहा वैद्य यांना पीएचडी प्रदान केली आहे.
नव्या जीवनामध्ये आधुनिकता ही सर्वत्र प्रचंड भिनली आहे. समाजांत वयोवृध्द, सामाजिक श्रेष्टत्व सगळ्या गोष्टी आता इतिहास जमा होतांना आपण पाहतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यांतील अलिबाग तालुक्यांतील रेवदंडा या छोट्याशा गावामधून दत्तात्रय नारायण उर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांनी श्री बैठकीच्या माध्यमांतून अध्यात्मिक ज्ञानगंगेचा झरा मोकळा केला. सुमारे पाच-सहा दशकांच्या कार्यामधून अध्यात्माचा महासागर निर्माण केला. अक्षरशः लाखो कुटुंबे संसाराची राखरांगोळी होताना बचावली. साक्षरता, नशामुक्ती, कुटुंब व्यवस्था बलशालीकरण असे अनेक फायदे समाजामध्ये बैठकीच्या माध्यमांतून आधुनिक युगांत समाजाने अनुभवले.
त्यामुळे नेहा वैद्य यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या समग्र जीवनाचा अभ्यास केला. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या पर्यावरण तसेच आरोग्य, स्वच्छता अशा योजनांच्या अभ्यास करून विद्यावाचस्पती ग्रंथाची रचना केली आणि आपला प्रबंध टिळक महाराष्ट्र विद्यापीठात सादर केला.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
5/5 - 4
You need login to vote.

उरणचे रुग्णालय राज्यात आदर्शवत असेल

‘सुधारित’ मॅगी बाजारात परत येतेय…

Related posts
One Response to “डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यावर नेहा वैद्य यांची पीएचडी”
  1. Sandeep Burungale
    # May 2, 2016 at 6:48 pm

    http://raigadtimes.co.in/?p=9285 या बातमी मध्ये कृपया ‘दत्तात्रय नारायण’ याऐवजी ‘नारायण विष्णु’ असा बदल करावा.

Leave a Reply