कर्जत शहराबरोबरच कडाव, डिकसळही कडकडीत बंद

0
6

कर्जत : कर्जत तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना पसरला आहे. कोरोनाची साखळी तुटवी म्हणून  कर्जतच्या व्यापारी वर्गाने आज सोमवारपासून तीन दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला. कर्जत शहराबरोबरच कडाव व डिकसळसुद्धा बंद ठेवण्यात आले आहे.

एका उत्तरकार्यात उपस्थिती दर्शविल्यामुळे 21 जणांना कोरोनाची लागण झाली. दिवसागणिक ही संख्या वाढतच आहे. कर्जत शहराबरोबरच शहराच्या लगत असलेल्या गावांमध्येसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ही साखळी तोडण्यासाठी कर्जतच्या व्यापारीवर्गाने कर्जत तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी फेडरेशनच्या सभेमध्ये जाहीर केला. त्यानुसार आज कर्जत कडकडीत बंद आहे. तसेच कडावची बाजारपेठ आणि डिकसळच्या व्यापाऱ्यांनीसुध्दा कर्जत बंदला पाठिंबा देत कडकडीत बंदमध्ये सहभाग घेतला. कधी नव्हे ते डी – मार्टसुद्धा बंद ठेवण्यात आले आहे.

बंदमध्ये कर्जत बाजारपेठेतील दुकाने बंद होती. मात्र बँकांचे व्यवहार सुरू असल्याने बँकेबाहेर ग्राहकांची थोडी गर्दी होती. एकंदरीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी करण्यात येत असलेला बंद शंभर टक्के यशस्वी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here