अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण; नानावटी रुग्णालयात दाखल

0
893

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांना शनिवारी संध्याकाळी कोविडच्या उपचारासाठी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमिताभ बच्चन यांनीही स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन या वृत्ताला दुजोरा दिला.

अमिताभ बच्चन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माझे कुटुंबीय आणि कर्मचार्‍यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आले आहे. मात्र, या चाचण्यांचे निकाल अद्याप यायचे बाकी आहेत. गेल्या 10 दिवसांमध्ये माझ्या जवळच्या संपर्कात असलेल्या लोकांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, अशी विनंती अमिताभ बच्चन यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here