देशात गेल्या सहा दिवसांत 1 लाख 10 हजार कोरोना रुग्णांची वाढ

0
145

नवी दिल्ली । देशात गेल्या सहा दिवसात 1 लाख 10 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या पाच लाख 28 हजार 859 वर पोहोचली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सलग पाचव्या दिवशी 15 हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली. 1 जूनपासून 3 लाख 38 हजार 324 रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत 3 लाख 9 हजार 712 रुग्ण बरे झाले असून, 2 लाख 3 हजार 51 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 58.56 टक्के आहे.
देशात एकूण करोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या 16 हजार 95 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 410 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या देशातील 1036 वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये प्रतिदिन 2 लाखांपेक्षा जास्त चाचण्या होत असून गेल्या चोवीस तासांमध्ये 2.3 लाख चाचण्या करण्यात आल्या. एकूण 82 लाख 27 हजार 802 चाचण्या झाल्या आहेत. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here