रायगडात कोरोना वेगाने पसरतोय…आज 234 पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद

0
7869
दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू; कोरोना बळींची संख्या 133 वर
बाधित रुग्णांची संख्या पोहोचली 3 हजार 683 वर

अलिबाग : रायगडात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरतो आहे. आज जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली असून, तब्बल 234 नवे पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 181 रुग्ण हे एका पनवेल तालुक्यातील आहेत. तर दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 133 वर तर रायगडात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 हजार 683 वर पोहोचली आहे.

याआधी जिल्हयात एकाच दिवशी सर्वाधिक 201 रुग्ण आढळून आले होते. मात्र आज तब्बल 234 रुग्ण आढळून आल्याने रायगडकर चक्रावले आहेत. आज (29 जून) नोंद झालेल्या 234 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील सर्वाधिक 181 रुग्णांचा समावेश आहे. पनवेल महापालिका हद्दीत 131 तर पनवेल ग्रामीणमध्ये 50 रुग्णांची नोंद झाली आहे. उरणमध्ये 5, खालापूरात 7, कर्जतमध्ये 5, पेणमध्ये 9, अलिबागमध्ये 4, मुरुडमध्ये 2, माणगाव तालुक्यात 11, तळामध्ये 1, रोहा तालुक्यात 4, श्रीवर्धनमध्ये 2, महाडमध्ये 1 आणि पोलादपूर तालुक्यात 2 नवीन रुग्ण आज आढळून आले आहेत.

दिवसभरात पनवेल महापालिका क्षेत्रातील 4 आणि उरणमधील 1 अशा 5 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर आज रायगडातील 113 रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामध्ये पनवेल मनपा येथील 61, पनवेल ग्रामीण 7, उरण 4, कर्जतमधील 18, पेण 1, अलिबाग 13, रोहा 2, श्रीवर्धन 1 आणि पोलादपूर तालुक्यातील 6 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत नोंद झालेल्या 3 हजार 683 रुग्णांपैकी 2 हजार 195 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. सद्यस्थितीत पनवेल मनपा 690, पनवेल ग्रामीण 291, उरण 53, खालापूर 42, कर्जत 68, पेण 50, अलिबाग 50, मुरुड 8, माणगाव 28, तळा 2, रोहा 48, सुधागड 1, श्रीवर्धन 11, महाड 8, पोलादूपर 5 अशा 1 हजार 355 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आतापर्यंत कोरोनाने झालेले मृत्यू – 133

पनवेल मनपा 76, पनवेल ग्रामीण 16, उरण 4, खालापूर 4, कर्जत 6, पेण 1, अलिबाग 6, मुरुड 2, माणगाव 2, तळा 2, श्रीवर्धन 3, म्हसळा 3, महाड 7, पोलादपूर 1 अशा 133 रुग्णांना कोरोनाने बळी घेतला आहे.

उपचारानंतर बरे झालेले रुग्ण – 2 हजार 195

पनवेल मनपा 1 हजार 248, पनवेल ग्रामीण 331, उरण 203, खालापूर 13, कर्जत 59, पेण 59, अलिबाग 63, मुरुड 17, माणगाव 64, तळा 12, रोहा 28, सुधागड 2, श्रीवर्धन 10, म्हसळा 29, महाड 31, पोलादपूर 26 अशा 2 हजार 195 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here