भारतीय संघाच्या माजी कर्णधाराचे कोलकात्यात निधन

0
802

नवी दिल्ली : भारतीय फुटबॉल संघाचे सर्वात यशस्वी कर्णधार चुनी गोस्वामी यांचे आज म्हणजेच गुरुवारी कोलकात्यात निधन झाले. कार्डिएक अरेस्टमुळे गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते.

https://twitter.com/IndianFootball/status/1255851674301685760/

गोस्वामी यांनी ५० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. १९६२ साली झालेल्या आशियाई खेळांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना चुनी गोस्वामी यांनी संघाला सुवर्णपदक मिळवून दिले होते.

https://twitter.com/Mohun_Bagan/status/1255847921318322177/

१९६२ च्या यशानंतर १९६४ सालीही गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला रौप्यपदक मिळाले होते. याव्यतिरीक्त कोलकात्यातील मोहन बगान फुटबॉल क्लबकडूनही ते सुरुवातीच्या दिवसांमध्ये खेळत होते.

https://twitter.com/BCCI/status/1255845439741595651/

फुटबॉलसोबतच गोस्वामी बंगालकडून स्थानिक क्रिकेटही खेळले आहेत.

https://twitter.com/rashtrapatibhvn/status/1255859143241396225/

त्यांच्या निधनामुळे भारतीय फुटबॉल क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.