माणगाव तालुक्यात आढळले 15 नवे कोरोना रुग्ण

0
4325
बाधित रुग्णांची संख्या 94 वर

सलीम शेख/माणगाव : जिल्ह्यातील सर्वांत मोठा तालुका समजला जाणार्‍या माणगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाने कहर केला आहे. रविवार, दि. 28 जून रोजी तालुक्यात रात्री उशिरापर्यंत 15 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या 94 वर पोहोचली आहे.

तालुक्यात माणगाव नगरपंचायत हद्दीत काल, 28 जून रोजी कोरोनाचे 8 नवे रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. तर हेदमलई येथे दोन तर माणगावजवळील इंदापूर गावांत 5 जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांची कोविड 19 टेस्ट काल पॉझिटीव्ह आली आहे. एकाच दिवशी 15 रुग्ण आढळून आल्याने माणगावकरांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. दोन महिन्यांत तालुक्यातील 28 गावांतून आजपर्यंत 94 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 64 रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून सुखरुप बाहेर पडले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यातील 28 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

बाधित रुग्णांमध्ये अगदी लहान बाळापासून ज्येष्ठ मंडळींचा समावेश आहे. त्यात 11 ते 13 वयोगटातील मुला, मुलींना कोरोनाची लागण झाल्याने सर्वांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. माणगावसह तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे व कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here