तळोजा मध्यवर्ती कारागृहातील 50 कैद्यांना पॅरोल

0
99

पनवेल : तळोजा मध्यवर्ती कारागृहातील 50 कैद्यांना गेल्या दोन दिवसांमध्ये पॅरोल देण्यात आला आहे. कोव्हीड-19 च्या धर्तीवर कारागृह प्रशासनाने गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेतला आहे.

तळोजा मध्यवर्ती कारागृहातून पॅरोल दिलेल्या या कैद्यांमध्ये 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा झालेले व ज्या कैद्यांची वर्तवणूक चांगली आहे, अशा कैद्यांचा समावेश असल्याचे कारागृह अधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर यांनी सांगितले. आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तब्बल 185 पेक्षा जास्त कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील 8 कारागृह पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामध्ये तळोजा मध्यवर्ती कारागृहाचाही समावेश असल्याने तेथील कैद्यांना पॅरोल देण्यात आला आहे.