मुरुड किनाऱ्यावर अग्नितांडव, ४ बोटी जळून खाक

0
1792

लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान

मुरुड । सुधीर नाझरे : मुरुडच्या किनाऱ्यावर बुधवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून, मासेमारी करण्याऱ्या बांधवांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्री अडीजच्या सुमारास अचानकपणे आग लागली. या घटनेत ३ मोठ्या बोटी तर १ लहान बोट आगीत जळून भस्मसात झाली. या बोटींमध्ये मासेमारी करणाऱ्या लाख रुपये किमतीच्या जाळ्या जळून खाक झाल्या असून, मच्छिमार बांधवांनी समुदातून मासेमारी करून पकडलेली तब्बल २० लाख रुपयांची मासोळीसुद्धा या आगीत जाळून भस्मसात झाली.

आग कशी लागली ? कश्यामुळे लागली ? कोणामुळे लागली ? या प्रश्नांची उत्तरे अजून गूढ असून पोलीस प्रशासन सदर घटनेची चौकशी करत आहे.