मुरुडमध्ये मासेमारी,विक्री ३१ मार्चपर्यंत बंद !

0
252

मुरुड : राज्य सरकारच्या आदेशानुसार कालपासून संपूर्ण महाराष्ट्रात संचार बंदी लागू करण्यात आली असून, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांना ३१ मार्चपर्यंत स्थागिती देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. याचा परिणाम आता इतर उद्योगांवर पाहावयास मिळत आहे.

रायगड जिल्यातील अनेक बांधवाचा मुख्य व्यवसाय शेती आणि मासेमारी आहे. आणि संचारबंदीमुळे आता मासेमारी, मासेविक्री तसेच इतर व्यवसायांना याची झळ सोसावी लागणार असून मुरुड तालुक्यातील राजापुरी बंदराजवळ असाच एक फलक पाहावयास मिळाला.

राज्य शासनाच्या आदेशानुसार मासेमारी, मासे विक्री आणि डिझेल विक्री यांना ३१ मार्चपर्यंत स्थगिती देणारा फलक प्रसिद्ध करण्यात आला. कोरोना हा विषाणू माणसांच्या संपार्गातून पसरत असल्यामुळे प्रसार टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.