अलिबाग तालुक्यात कोरोनाचे 4 नवीन रुग्ण आढळले

0
177
बाधित रुग्णांची संख्या पोहोचली 119 वर

अलिबाग : अलिबाग तालुक्यात आज (29 जून) कोरोनाचे चार नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पंतनगर येथील 1, वेलवली येथील 1 आणि नवेनगर पोयनाड येथील आरोग्यसेविकेसह तिच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 119 वर पोहोचली आहे.

पंतनगर येथील एका 62 वर्षीय वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तर वेलवली येथील एका 23 वर्षांच्या तरुणाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. हे दोन्ही रुग्ण आजारी असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना सदृश्य लक्षणे असल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यांचा रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आला असून, या दोघांनाही कोविड-19 विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

तर नवेनगर पोयनाड येथे दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्यसेविका असलेल्या 53 वर्षीय महिलेसह तिच्या 30 वर्षीय मुलाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या दोन्ही रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. चारही रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

दिलासा देणारी बाब म्हणजे, 13 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यामध्ये शहापूर येथील 4, रांजणखार येथील 3, गोंधळपाडा येथील 1, मुळे येथील 1, हाशिवरे येथील 2, शिरवली येथील 1 आणि अलिबाग कोळीवाडा येथील 1 रुग्णाचा समावेश आहे. या रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, तालुक्यात आजअखेर कोरोना बाधित रुग्णांची संख्या 119 वर पोहोचली आहे. यापैकी 6 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 63 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सद्यस्थितीत 50 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here