पोलादपूर : दिवीलमध्ये जमावाकडून पती-पत्नीला मारहाण

0
376

पंधरा जणांविरुध्द गुन्हा दाखल; पूर्ववैमनस्यातून हल्ला

पोलादपूर/शैलेश पालकर : तालुक्यातील दिवील गावामध्ये जुन्या वैमनस्याच्या वादातून पती, पत्नी आणि पतीच्या पुतण्याला जमावाने मारहाण केली. याप्रकरणी पोलादपूर पोलिस ठाण्यांमध्ये पंधरा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.

बुधवारी रात्री फिर्यादी प्रियंका प्रकाश देवे आणि तिचा पती प्रकाश बाबू देवे तसेच पुतण्या हे दिवील कुंभारकोंड येथे त्यांच्या नातेवाईकांकडे जेवणासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना अनंत चांढवीकर, रुपेश चांढवीकर, तुषार चांढवीकर, विवेक चांढवीकर, विठ्ठल चांढवीकर, गणेश चांढवीकर, जितेश चांढवीकर, निलेश देवे आणि अन्य दहा ते पंधरा जणांनी जुन्या वादावरून तसेच गावाच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या कमानीच्या नव्या वादाचा विषय बाचाबाची केली. त्यावेळी वरील ८ जणांसह इतर दहा ते पंधरा यांनी बेकायदेशीरपणे जमाव करून फिर्यादी यांचा पती प्रकाश देवे याला लाथा-बुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी त्यांचा मुलगा मनीष याने दिवील कुंभारकोंड येथून त्यांच्या मालकीची रिक्षा (क्र. एमएच06 बीव्ही 0580) आणून दिवील कुंभारवाडी येथे फिर्यादींना घेऊन जाण्यासाठी आणली असता पुन्हा गावाबाहेर फिर्यादी याच्या अंगावर धावत जाऊन शिवीगाळ केली आणि फिर्यादी, त्यांचे पती आणि पुतण्याला मारहाण केली. यावेळी फिर्यादी हे त्यांचे पती आणि पुतण्याला सोडविण्याकरिता गेले असता विठ्ठल चांढवीकर याने फिर्यादी प्रियंका यांच्या डोक्यात पाठीमागून येऊन लाकडी हिरक्याची उपट टाकून जखमी केले.

या कृत्याद्वारे मा.जिल्हाधिकारी यांचेकडील 1442020 दिनांक 352020 रायगड जिल्ह्यामध्ये फौ.प्र.सं.1973 चे कलम 144 (1) (3) अन्वय लागू असलेल्या जमावबंदीच्या आदेशांचे उल्लंघन केले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी न घेता कोविड 19 विषाणूचा संसर्ग संभव असून त्यांना याची जाणीव असताना देखील घातक कृत्य करून शासनाच्या या आदेशाकडे दुर्लक्ष करून एकत्रितपणे बेकायदेशीररित्या जमाव जमविला.

याप्रकरणी जखमी फिर्यादी प्रियंका देवे आणि तिचा नवरा प्रकाश देवे यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालय व तेथून माणगाव येथे करण्यात आले. या कारणास्तव गुरुवार, दि. 7 मे 2020 रोजी दुपारी 12.18 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले लाकडी हिरक्याची उपट हे हत्यार पोलादपूर पोलिसांनी स्पॉट पंचनामा करताना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा रजिस्टर नंबर 212020 भा द वि 324,143, 147, 149, 188, 269, 270 मुंबई पोलीस कायदा 37 (1) (3) व 135, साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 2 व 3, महाराष्ट्र कोविड कायदा कलम 19 उपाय योजना नियम 2020 चे नियम क्रमांक 11 चे उल्लंघन, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 (??) प्रमाणे वरील ८ जणांसह इतर 10 ते 15 सर्व यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आशिष नटे हे अधिक तपास करीत आहेत.