३१ मार्चपर्यंत जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद !

0
299
मुरूड | संतोष रांजणकर : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभर हाहाकार उडाला असल्याने महाराष्ट्रातही काही रुग्ण आढळले असल्याने महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रतिबंधक उपाय म्हणून सर्व पर्यटन क्षेत्रावर निर्बंध लागू करण्यात आले असून सार्वजनिक क्षेत्रात गर्दी नकारण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या भितीमुळे पर्यटकांनी पर्यटनासाठी जाणे टाळले आहे. त्यामुळे मुरुड मधिल सर्व पर्यटन क्षेत्राकडे पर्यटकांनी पाठ फिरवली असल्याने पर्यटन व्यसायावर मंदीचे सावट पसरले आहे.
चिनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यानंतर त्याचे पडसाद जगभर उमटले आहेत. यातून महाराष्ट्र राज्य सुद्धा सुटलेला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात करोना प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पर्यटन क्षेत्रावर पर्यटकांना जाण्यास मज्जाव केला आहे. याचा परिणाम पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येत असतात. कोरोना व्हायरसमुळे पर्यटकांनी सुद्धा पर्यटनासाठी जाणे टाळले असल्याने मुरूड मध्ये पर्यटक येत नाहीत. त्यामुळे हाॅटेल, लाॅज व्यवसाय सुद्धा ठप्प झाले आहेत. विकएंड साठी येणाऱ्या पर्यटकांची बुकिंग रद्द झाली आहे. बिचवरील घोडेस्वार, घोडागाडी व्यवसाय सुद्धा ठप्प झाले आहेत, तसेच लहान मोठ्या स्टाॅलधारकांना सुद्धा मोठा फटका बसला आहे.
मुरूड बिचवर भयान शांतता पसरली आहे. खोरा बंदरात सुद्धा सन्नाटा पसरलेला आहे. राजपुरीच्या जेटीवर जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमी वर्दळ असते परंतु आज तुरलक पर्यटक वगळता शांतता पसरलेली पहावयास मिळत आहे.