इन्व्हर्टरची पिन लावताना विजेचा धक्का; एकाचा मृत्यू

0
67
माणगावातील वाढवण येथील दुर्घटना

सलीम शेख/माणगाव : घरातील इन्व्हर्टरची पिन बोर्डात लावत असताना विजेच्या तीव्र धक्क्याने एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना माणगाव तालुक्यातील वाढवण येथे घडली.

ही दुर्घटना आज, 29 जून रोजी पहाटे घडली. दिलीप पांडुरंग शिंदे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वाढवण गावातील दिलीप शिंदे (वय 45) हे त्यांच्या घरातील वीज आल्याने, इन्व्हर्टरची पिन बोर्डात लावत होते. मात्र पिन लावत असताना त्यांचा विजेचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे ते खाली कोसळले. त्यांना तातडीने औषधोपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे आणण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत झाल्याचे घोषित केले.

प्रशांत जगन्नाथ शिंदे (वय 20, रा.वाढवण ता.माणगाव) या घटनेची खबर माणगाव पोलीस ठाण्यात दिली. या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक जाधव हे करीत आहेत. दरम्यान, या घटनेने वाढवण गावासह इंदापूर विभागातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here