मुरूड तालुकास्तरीय महोत्सवात क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धां

0
101

मुरूड-जंजिरा | सुधीर नाझरे : मुरूड तालुकास्तरीय क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन राजिप शाळा आगर दांडा केंद्रात उत्साहात करण्यात आले. उद्घाटनसमयी मुरूड तालुका पंचायत समिती सभापती आशिका ठाकूर, उपसभापती चंद्रकांत मोहिते, गटविकास अधिकारी संजय चव्हाण, गटशिक्षणाधिकारी मेघना धायगुडे आगरदांडा गृप ग्रामपंचायत सरपंच वृषाली डोंगरीकर, मुरुड तालुका शिवसेनाप्रमुख रूषीकांत डोंगरीकर, भंडारी समाज अध्यक्ष सूर्यकांत तोडणकरण, नरेंद्र हेदुलकर, संतोष पाटील, नवीद गजगे, मुख्याध्यापिका अलका शिंदे, केंद्रप्रमुख दीपक जाधव, प्रवीण भाटकर, मनील कचरेकर, कीर्ती भगत, मानसी चिदरकर, सईदा डावरे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक करतांना गटविकास अधिकारी संजय चव्हाण म्हणाले की, “क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या आदेशान्वये साजरा करण्याचे आदेश प्राप्त झाले असुन, क्रीडा स्पर्धा व नृत्य-नाटय स्पर्धांचे आयोजन उत्तम प्रकारे शिक्षकांनी केले असुन विद्यार्थ्यांनी हीरीरिने सहभागी होऊन नैपुण्य दाखवावे असे सुचित केेले. या वेळी पं .स. सभापती आशिका ठाकूर  म्हणाल्या की , मन , मनगट आणि बुद्धी यांचा समन्वय साधल्यास कुठल्याही क्षेत्रात कौशल्य विकसित करता येते या कडे लक्ष वेधले . तर उपसभापती चंद्रकांत मोहिते यांनी खेळाचे जीवनात अनन्य साधारण महत्व असुन मुलांनो खुप शिका, मेहनत करा आणि खुप मोठे व्हा मात्र गुरुजनांचा कधीही अनादर करु नका असे आवाहन केले. गट शिक्षणाधिकारी मेघना धायगुडे ,साधन व्यक्ती महेंद्र सातामकर, प्रवीण भगत यांनी शिक्षकांच्या उत्कृष्ट आयोजना बद्दल आनंद व्यक्त केला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालाजी क्डवले, कणसे सर, अलका शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चेतन चव्हाण व प्रल्हाद गोंजी यांनी केले