कोरोनाला रोखण्यासाठी मुरुडशहर कडकडीत बंद

0
142

मुरुड जंजिरा । मुरूड तालुक्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने शहरातील व्यापार्‍यांनी तिन दिवसांची बंद पाळले आहे. रविवारी पहिल्याच दिवशी या बंदला नागरीकांनी शंंभर टक्के पाठींबा दिला.मुख्य बाजारपेठ, जुनीपेठ , व इतर परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. रिक्षा, मिनीडोर बंद असल्याने सकाळी सात वाजल्यापासून गजबजणारी ठिकाणी ओस पडलेली दिसून आली. नागरिकांनी घराबाहेर न येणे पसंत केले तर शहरातील व्यापार्‍यानी आपले व्यवसाय बंद ठेवले होते.

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी अ‍ॅक्टीव्ह मेंबरच्या सदस्यांनी तीन दिवसीय मुरुड शहर बंद करण्याचे आवाहन केले आहे. ज्यावेळी दुकाने उघडतील त्यावेळी नागरिकांनी दुकानावर गर्दी करू नका तोडांला मास्क लावुन घराबाहेर पडा, सोशील डिस्टनचा वापर करा असे आवाहन कुणाल सतविडकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here