तळा येथे सिमेंट मिक्सरखाली सापडून महिलेचा मृत्यू

0
281

तळा : तळा येथून मांदाडकडे जाणार्‍या सिमेंट मिक्सरखाली सापडून जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा उपचादारम्यान मृत्यू झाला. ही घटना आज (8 मे) सकाळी घडली.

लक्ष्मी जानू काटे (वय 60) असे मृत महिलेचे नाव आहे. तळा येथून मांदाड येथे जाणार्‍या सिमेंट मिक्सर खाली सापडून लक्ष्मी काटे या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी माणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

इंदापूर ते मांदाड हा रस्ता नव्याने करण्यात आला आहे; परंतु वळणावर काही प्रमाणात तांत्रिक चुका असल्याने वाहनावरचा ताबा सुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या रस्त्यावर यापूर्वीदेखील असेच अपघात झालेत. शासनाने या नवीन रस्त्याचे टेक्नीकल ऑडिट करण गरजेचे आहे. जेणेकरुन असे अपघात घडणार नाहीत, असे जाणकारांकडून बोलले जात आहे.