पेट्रोल-डिझेल वाढीविरोधात रायगड जिल्हा काँग्रेसची अलिबागेत निदर्शने

0
37
photo by : jitu shigvan

अलिबाग । देशात सातत्याने सुरु असलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेसने आज अलिबागेत आंदोलन केले. दरवाढ कमी करा या मागणीसह केंद्र सरकारविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.अलिबाग शहरातील ठिकरुळ नाका येथील पेट्रोलपंपावर काँग्रेसचे कार्यकर्ते जमा झाले होते. यावेळी पंपावर पेट्रोल भरायला येणार्‍या वाहनचालकांनाही त्यांनी बोलते केले. नागरिकांनीही वाढत्या पेट्रोल-डिझेल दराबाबत नाराजी व्यक्त केली. यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेवून दर कमी करण्याबाबतचे निवेदन केंद्र सरकारपर्यंत पोहचवण्याची विनंती केली.
यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रध्दा ठाकूर, अलिबागचे तालुकाध्यक्ष योगेश मगर, युवक अध्यक्ष अ‍ॅड. प्रथमेश पाटील, काँग्रेसचे पदाधिकारी मोदी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here