कनिका कपूरची सहावी कोरोना टेस्ट “निगेटिव्ह”; हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज!

0
122

लखनऊ : करोनाची लागण झाल्यानं गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली बॉलिवूड गायिका करिना कपूर हिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. कनिका गेल्या अनेक दिवसांपासून उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये होती.

कनिका कपूरची सहावी कोरोना टेस्ट केली असता निगेटिव्ह आली. यापूर्वीच्या पाचही टेस्ट कनिकाच्या पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यामुळे तिच्या कुटूंबाची चिंता वाढली होती. मात्र, तिची सहावी टेस्ट निगेटिव्ह आल्याने तिच्या कुटूंबासाठी हे वृत्त दिलासादायक आहे. आता 18 दिवसांच्या उपचारानंतर कनिका एकदम ठीक झाली असून तिला रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. करोना विषाणूची लागण झाल्यामुळं तिला संजय गांधी ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

कनिकाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यावर ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय होती. करोनाची लागण झाल्यानंतरही ती डिनर पार्टीला गेली होती. तिच्या संपर्कात आलेल्या जवळपास २५० ते ३०० लोकांचा नंतर शोध घेण्यात आला होता. सुदैवाने त्यापैकी कोणाला अद्याप करोनाची लागण झालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here