सध्या राज्याला उद्धव ठाकरे यांची नाही तर फडणवीसांची गरज, पहा, कोण म्हणताय असं..

0
25800
  • शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री नाही तर अनुभवी प्रशासकाची गरज
  • निरंजन डावखरे यांनी ठाकरे सरकारला काढले चिमटे

रायगड: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत असताना भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी ठाकरे सरकारवर टीका करून नवा वाद निर्माण केला आहे.

काय म्हणाले निरंजन डावखरे ?

सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची गरज असल्याचे ट्विट करत ठाकरे सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. याआधीही त्यांनी ठाकरे सरकार हे स्थगिती सरकार असल्याची टीका केली होती.

निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. भाजपने सत्ता गमावल्यानंतर ठाण्यातील पक्षाची जबाबदारी निरंजन डावखरे यांच्याकडे सोपोवली आहे. काही दिवसांआधीच त्यांच्यावर भाजप जिल्ह्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. ठाण्यात भाजपची कमान चढती ठेवण्याचे आव्हान डावखरेंच्या पुढे असेल