घरात बसून कंटाळल्यावर ‘तिने’ चक्क ट्विटरवर शेअर केला फोन नंबर आणि मग..

0
390

सध्याच्या घडीला सर्वच देशांमध्ये करोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आहे. करोना व्हायरसचा मोठा फटका क्रीडा जगतालाही बसला आहे. त्यामुळे सर्च स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. सध्याच्या घडीला एकही स्पर्धा सुरु नाही. त्यामुळे खेळाडू सध्या घरी बसून आहेत. त्यांना मैदानात सरावही करता येत नाही. बराच काळ घरात कोंडून राहिल्यानं काही खेळाडू वैतागलेही आहेत. अशाच एका कंटाळलेल्या टेनिस सुंदरीने विरंगुळा दूर करण्यासाठी सोशल मीडियावर चक्क स्वतःचा फोन नंबर शेअर केला.

View this post on Instagram

Cali doesn’t want to say goodbye to summer ☀️

A post shared by Maria Sharapova (@mariasharapova) on

टेनिस विश्वातील सुंदरी म्हणून ओळखली जाणारी मारिया शारापोव्हादेखील लॉकडाऊनला कंटाळली आहे. शारापोव्हाने आपला दूरध्वनी क्रमांक ट्विटरवर शेअर केला आहे.

हा क्रमांक शेअर करताना तिने म्हटले आहे की, ” तुमचे लॉकडाऊनमधील अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. त्याचबरोबर कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा.” त्यामुळे सध्याच्या घडीला शारापोव्हाचा फोन चांगला खणाणत असल्याचे दिसत आहे.

हा नंबर शेअर केल्यावर फक्त ४० तासांमध्ये तब्बल २२ लाख लोकांनी तिच्याबरोबर संपर्क साधला असल्याचे समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here