केंद्र सरकार गहू 2 रुपये, तांदूळ 3 रुपये किलो दराने देणार

0
393

नवीदिल्ली । केंद्र सरकार 80 कोटाी लोकांना 27 रुपये किलोचा गहू 2 रुपये किलोने देणार तर 37 रुपये किलोचा तांदूळ 3 रुपये किलोने देणार अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
130 कोटी जनतेच्या सुरक्षेसाठी हा लॉकडाउन आवश्यक होता असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. करोनाशी लढण्यासाठी तीन ते चारच उपाय आहेत. आजपर्यंत जगभरात 16 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. ही बातमी निश्चितच चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे थोडा त्रास झाला तर तो सहन केला तो आवश्यक आहे.
दूध, किराणा, रेशन, मांस, पशूचारा, भाजीपाला हे सगळी दुकानं सुरु राहणार आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांसोबत राज्य सरकारं आहेत असंही जावडेकर यांनी स्पष्ट केले. सरकारी संस्थांमध्ये जे कंत्राटी कामगार आहेत त्यांनाही पगार दिला जाईल. खासगी कंपन्याही यासाठी सकारात्मक असल्याचे जावडेकर यांनी म्हटले आहे.