पालीत सापडला पहिला कोरोना रुग्ण..,पाली बाजारपेठ राहणार चार दिवस बंद

0
74
अमित गायकवाड / पाली /वाघोशी : सुधागड तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण नुकतेच बरे होऊन घरी परतले होते. मात्र तालुक्याचे मुख्यालयाचे ठिकाण असलेले पाली कोरोनापासून दूर होते. शनिवारी (ता.27) एका तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. खबरदारी म्हणून रविवार (ता.28) ते बुधवार (ता.1) पाली बाजारपेठ बंद राहणार आहे.

 या तरुणाच्या घरातील 10 जणांना कॉरेंटाईन केले असल्याची माहिती तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी सकाळला दिली. तसेच पाली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आलाप मेहता तसेच विक्रांत चौधरी यांनी खबरदारी म्हणून पाली बाजारपेठ 4 दिवस बंद राहणार असल्याचे सांगितले.
   सुधागड तालुक्यात मे महिन्यात कोरोनाने शिरकाव केला (ता.24) नागशेत येथील एका 62 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉजीटिव्ह आला होता. त्यानंतर 2 जून ला गोमाशी येथील एका 24 वर्षीय तरुण व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र काही दिवसांपूर्वी हे दोन्ही रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र आता पालीत कोरोना रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here