आरटीओमार्फत होणार्‍या शिबिरांचे वेळापत्रक पुढे ढकलले

0
97

अलिबाग । करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी परिवहन कार्यालयातील गर्दी कमी करणे आवश्यक असल्याने प्रतिबंधात्मक व खबरदारीचा उपाय म्हणून परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशान्वये 31 मार्च, 2020 पर्यंत कोणतेही शिबिराचे काम होणार नाही.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयातील मुख्यालयातील शिकाऊ अनुज्ञप्तीचे कामकाज 31 मार्चपर्यंत बंद असेल. ज्या अर्जदारांनी 31 मार्चपर्यंत अपॉईंटमेंट घेतल्या असतील त्यांच्या अपॉईंटमेंट पुढील महिन्यात रिशेड्युल करण्यात आलेल्या आहेत. 31 मार्चपर्यंत कार्यालयामध्ये फक्त अनुज्ञप्तीचे नुतनीकरण, वाहनांच्या पुर्ननोंदणी योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण, परवानासंबंधी कामेच करण्यात यावे इतर कामे जसे वाहन हस्तांतरण कर्जबोजा नोंद इ. कामे पुढे ढकलण्यात यावी. नवीन नोंदणीचे सर्व काम सुरु राहील. 19 मार्च रोजी मुरुड कॅम्पच्या अपॉईंटमेंट्स 16 एप्रिल रोजी रिशेड्युल केल्या आहेत. 20 मार्च 2020 रोजी अलिबाग कॅम्पच्या अपॉईंटमेंट्स 17 एप्रिल रोजी रिशेड्युल केल्या आहेत.
करोना विषाणूचा प्रसार तीव्रता वाढल्यास परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्यच्या मुंबई यांच्याकडून ज्या प्रमाणे आदेश येतील त्याप्रमाणे पुढील निर्णय घेतले जातील व त्याबाबत जनतेला कळविण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण, जि.रायगड उर्मिला पवार यांनी केले आहे.