पेणमध्ये आज कोरोनाचे 9 रुग्ण आढळले

0
4603
बाधित रुग्णांची संख्या 110 वर

पेण : पेण तालुक्यात आज कोरोनाचे 9 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे.

आज आढळून आलेल्या नवीन 9 रुग्णांमध्ये पेण कोळीवाडा येथील 50 वर्षीय व्यक्ती, फणसडोंगरी येथील 28 वर्षीय व्यक्ती, कुंभारआळी येथील 46 वर्षीय व्यक्ती, चिंचपाडा येथील 35 वर्षीय व्यक्ती, तांबडशेत येथील 5 वर्षीय मुलगा, दूरशेत येथील महिला, लोकमान्य सोसायटी येथील 33 वर्षीय व्यक्ती, गडब येथील 34 वर्षीय व्यक्ती आणि हनुमान आळी येथील एका 20 वर्षीय रुग्णाचा समावेश आहे. या सर्वांची कोविड 19 टेस्ट आज पॉझिटीव्ह आली असल्याची माहिती पेण तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे. तर महाविर मार्ग ता. पेण येथील एक 36 वर्षीय रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतला.

आजअखेर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, 59 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सद्यस्थितीत 50 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती पेणच्या तहसीलदार अरुणा जाधव यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here