साळावमध्ये नमाज पढण्यासाठी एकत्र आलेल्या सात जणांविरोधात गुन्हे दाखल

0
1364

रेवदंडा । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करत मुरुड तालुक्यातील साळाव येथील मशिदीमध्ये नमाज पढण्यासाठी एकत्र आलेल्या सात जणांविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी व मानवी जीविताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असताना, सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी न घेता, शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास साळाव येथील मशिदीमध्ये सातजण नमाज पढण्यासाठी एकत्र जमले होते. ही बाब निदर्शनास रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जैतापूरकर यांनी याप्रकरणी सातही जणांवर भादंवि कलम 143, 269, 270, 188, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(3), 135, साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 2, 3, 4 तसेच महा. कोविड-19 उपाययोजना नियम 2020 क्र. 11 चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.