कर्जबाजारी झाल्याने युवकाची आत्महत्या

0
333

मुरुड । मुरुड तालुक्यातील काशीद येथे राहणारे सचिन जनार्दन महाडीक या 45 वर्षीय युवकाने कर्ज बाजारी झाल्यामुळे राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने फास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात एडीआर दाखल करण्यात आला असून मुरुड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसुद्धा करण्यात आले आहे.

मुरुड पोलिसांनी माहिती सांगताना सांगितले की, सदरचा इसम मुंबई येथे राहत होता तो आपल्या मूळ गावी काशीद येथे आला असताना त्यांनी स्वतःच्या राहत्या घरात आत्महत्या केली आहे. सदरील घटनेचा तपास मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन वाणी करीत आहेत.