कर्जत | मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील एका आदिवासी कुटुंबाचे घर कोसळले असून भर पावसात हे कुटुंब उघड्यावर आले आहे. तर सोमवारी (१८ ऑगस्ट) रात्री अन्य दोन शेतकर्यांच्या घराच्या भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या. तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीमधील आशाणे ठाकूरवाडीमधील एका आदिवासी कुटुंबाचे घर पावसामुळे कोसळले आहे.
कोर्लई | मुरुड तालुक्यातील मीठेखार येथे घरालगत असलेली संरक्षक भिंत मंगळवारी (१९ ऑगस्ट) सकाळी कोसळली. आवाजाच्या दिशेने पाहण्यासाठी गेलेल्या विठा मोतीराम गायकर (वय ७५) या वृद्ध महिलेच्या अंगावर डोंगराच्या मातीचा मलबा येऊन गाडल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
अलिबाग | अतिवृष्टीमुळे दरड कोसळून गावातील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. मदतीच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मानसी दळवी आणि शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील दोघीही घटनास्थळी पोहचल्या. मात्र तेथे गेल्यानंतर चित्रलेखा पाटील यांनी सत्ताधार्यांच्या नावाने खरी खोटी सुनवायला सुरुवात केली.
नागोठण | सतत कोसळणार्या मुसळधार पावसाने सुधागड तालुका व रोहा, नागोठणे परिसराला अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे दोन ते तीन दिवसांपासून दुथडी भरुन वाहणार्या नागोठणे येथील अंबा नदीने शेवटच्या श्रावणी सोमवारी (१८ ऑगस्ट) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली.
अलिबाग | राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे, अलिबाग नगरपालिकेचे माजी नगरसेवक अॅड. सागर रामकृष्ण पाटील यांचे सोमवारी (१८ ऑगस्ट) रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रामनाथ येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले.
अलिबाग | अतिवृष्टीमुळे निर्माण होणार्या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेतपीक, फळबागांचे नुकसान झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल विनाविलंब सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत.
अलिबाग | रायगड जिल्ह्यात आज सलग पाचव्या दिवशी पावसाची संततधार सुरु होती. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. नागोठणे आणि महाडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. रोहा, पेण, अलिबाग, माथेरान, माणगाव, तळा, पोलादपूर, श्रीवर्धन या तालुक्यांत सर्वांधिक पाऊस पडला. मुरुडमध्ये सर्वांत कमी पाऊस पडला.
पेण | मुंबई गोवा महामार्गावरील साई सहारा रेस्टॉरंटसमोर एनपीआर सीसीटिव्ही कॅमेरांचे लोकार्पण आज, १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.
अलिबाग | माजी मुख्याध्यापक, आवास गावातील कुस्तीप्रेमी व्यक्तिमत्व रायगड भूषण प्रमोद मनोहर भगत यांची रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या सरचिटणीसपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
अलिबाग | उमाजी म. केळुसकर | प्रत्येक प्रदेशाला एक स्वतःची ओळख असते, एक स्वाभाविक लय असते. रायगड जिल्ह्याच्या बाबतीत ही लय त्याच्या निसर्गरम्य सौंदर्याशी, ऐतिहासिक वारशाशी आणि इथल्या मेहनती लोकांशी जोडलेली आहे. मात्र, काही वेळा बाह्य शक्ती या लयीत असा विघातक सूर मिसळतात की त्यातून त्या भूमीचे मूळ स्वरूपच धोक्यात येते.
खोपोली | खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष कुलदिपक शेंडे यांच्या प्रवेशाने शिवसेनेचे संघटन आणखी मजबूत होणार असून ग्रामीण भागातही पक्षाचा विस्तार करा, असे आवाहन शिवसेनेचे नेते, मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. बुधवारची गटारी ते आज रात्रीच करतील, असा टोलाही गोगावलेंनी लगावला आहे.
21.1k
मुरुड-जंजिरा | मुरुडच्या काशिद समुद्रकिनार्यावर चरसने भरलेली गोणी सापडल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल ११ किलो १४८ ग्रॅम चरसचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत ५५ लाख ७४ हजार आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या संपूर्ण परिसराची तपासणी करत, किनार्यावर आणखी कुठे किंवा पाकीटे सापडतात का? याचा शोध घेतला.
लोणेरे | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या लाखो वाहनचालक आणि प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. अनेक वर्षांपासून रखडलेले लोणेरे येथील उड्डाणपुलाचे काम अखेर अंतिम टप्प्यात असून, गणेशोत्सवापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
लोणेरे | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लाखपाले येथे वॅगनार कारने, कंटेनरला पाठीमागून धडक दिली. या अपघातात कारमधील एका महिला डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. डॉ. प्रियंका भास्कर आहेर (वय ३२) असे त्यांचे नाव आहे. मंगळवारी (१२ ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
रोहा | रोहयात पारंपारिक पध्दतीने गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. रोहयात सततधार पाऊस सुरू होता, या पावसाने गोविंदा पथकांमध्ये जान आणली, हा पारंपारिक सण अतिशय आनंदात साजरा झाला. शहरातील तिन्ही प्रमुख आळयांमधुन गोविंदा निघतो, दुपारनंतर एकामागुन एक असे ठरलेल्या क्रमाने हे गोविंदा रोहा बाजारपेठेत आले, येथिल उंच दही हंडया फोडण्यात आल्या.
कोलाड | रोहा तालुक्यातील पुगांव ते ऐनवहाळ या मार्गावर ट्रक उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर चारजण जखमी झाले. माल खाली करणार्या हमालांना ट्रकमध्ये बसवून अपघातग्रस्त ट्रक हा पुगांव ते ऐनवहाळ असा चालला होता. ऐनवहाळ गावाच्या हद्दीत कच्च्या रस्त्यावर टायर गेल्याने ट्रक चिखलाच्या मातीत खचून उलटला.
दिघी | श्रीवर्धन तालुयातील वडशेत गावाजवळ असलेला पूल सध्या शेवटची घटका मोजत आहे; मात्र याकडे शासकीय अधिकार्यांचे पत्रव्यवहार करण्यापलीकडे काहीच हालचाल नसल्याचे समोर आले आहे, त्यामुळे या पावसाळी दुर्घटना घडल्यास तब्बल नऊ गावांचा संपर्क तुटण्याची शयता आहे.
श्रीवर्धन | श्रीवर्धन येथील गोखले महाविद्यालयाच्या आवारामध्ये कचरा व घाण व चिखल याचा खच पडला असून त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली पहायला मिळते. गोखले महाविद्यालयाच्या परिसरातच गोखले विद्यालयाची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेमध्ये लहान लहान विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
म्हसळा | म्हसळा तालुक्यात आणखी एका वृध्दाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (३१ जुलै) रोजी समोर आली आहे. ही हत्या नातवानेच केल्याची माहिती समोर आल्याने म्हसळ्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी म्हसळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हसळा | म्हसळा तालुक्यातील वांगणी, मोरवणे, घूम परिसरात बिबट्याने चांगलीच दहशत निर्माण केली आहे. गेल्या तीन महिन्यांत मोरवणे गावातील दोन शेतकर्यांची गोठ्यात बांधलेली तीन वासरे, घूम गावातील एकाच शेतकर्याची दोन वासरे बिबट्याने फस्त केली आहेत.
पेण | पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीचा होत असलेला अधिकचा विस्तार फेज-३ पाहता येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विस्तारीकरणाला शिर्की गावातील आमच्या काही ग्रामस्थांचा जाहीर पाठिंबा असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
पनवेल | गोपाळकाला निमित्त गोविंद पथकाकडून थरावर थर लावत मानवी मनोरा तयार करण्यात आला. हा सहासी खेळ सर्वत्र लोकप्रिय आहे. त्याशिवाय दहीहंडी उत्सव अपुरा आहे. दरम्यान थरांचा थरार लावला जात असताना त्याला कामोठे येथे शनिवारी शिवकालीन युद्ध कलेची एक प्रकारे सलामी देण्यात आली. शितल दिनकर, जयश्री झा सुद्रिक यांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊ पथकाने लाठीकाठी , तलवारबाजी आणि दांडपट्ट्याचे प्रत्यक्षिके सादर केले.
पनवेल | पनवेल महापालिका अंतर्गत सर्व भागातील खड्डेमुक्त रस्त्यासाठी व भ्रष्टाचारी कंत्राटदारांवर कारवाई करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला.
सुधागड-पाली | पालीतील सरसगड किल्ल्यावरून पडून एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (२ ऑगस्ट) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. निखिल कदम असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा सातारा येथील आहे व पुणे येथे नोकरी करतो. एका कंपनीचा ग्रुप पुण्यातून पालीतील सरसगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आला होता.
पाली/वाघोशी | सुधागड तालुक्यातील गोंदाव, हातोंड आणि माठळ या तीन गावांमध्ये रविवारी (२७ जुलै) पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोड्यांची मालिका घडली. अज्ञात टोळीने धारदार शस्त्रांच्या धाकाने गावकर्यांच्या घरांमध्ये घुसून सोने, रोकड, बँकेशी संबंधित कागदपत्रे लंपास केली.
कर्जत | तालुक्यातील ताडवाडी येथील बंद असलेल्या घरात ड्रग्जसदृश्य कारखान्याचा नेरळ पोलिसांनी पर्दाफाश केला. घरात नव्याने आलेल्या भाडेकरूंकडून काहीतरी चुकीचे चालले आहे, असे दिसून आले. त्यानंतर ग्रामस्थांनी मध्यरात्री नंतर या कारखाना उद्ध्वस्त केला.
खेपोली | हाळ ग्रामपंचायतीच्या काळात रहिवाशांची तहान भागवून जीवनदायिनी ठरलेली पाण्याची टाकी आज मोडकळीस आली असून, शेवटच्या घटका मोजत आहे. टाकीच्या मुख्य कॉलमला तडे गेल्याने टाकीशेजारी राहणार्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
खोपोली | खालापूर तालुक्यातील कलोते ग्रामपंचायत हद्दीमधील लाईफ अँड जॉय यारिसॉर्टमधील कामगाराचा कलोते धरणात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी (१२ ऑगस्ट) सकाळी ही घटना घडली. अभय शिवाजी राऊत असे या मृत कामगाराचे नाव असून, माजलगाव बीड जिल्ह्यातील आहे.
उरण | उरण तालुक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दही हंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी गोविंदा रे गोपाळा - - -तुझ्या घरात नाही पाणी रे घागर उताणी रे गोपाळा अशा जय घोषाने परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बाल गोपाळ न्हाऊन निघाले होते.
उरण | मावळ-पिंपरी, चिंचवड, तळेगाव आणि चाकण हा परिसर देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल उत्पादन केंद्रांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या उद्योजकांना उत्पादनाची निर्यात करताना वाहतूक कोंडीत वेळ जातो.
महाड | महाड शहरासह तालुक्यात दहीहंडी उत्सव आनंदात साजरा करण्यात आला. यावर्षी महाड शहरात शिवसेना पुरस्कृत श्री भरतशेठ गोगावले मित्रमंडळाच्या दही हंडी उत्सवा सोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनेही दही हंडी उत्सवाचे आयोजन केल्याने गोविंदा पथकांसाठी पर्वणीच ठरली.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे येथे २२ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ निष्पाप जीवांचा बळी गेला. यामध्ये साखर सुतारवाडी येथे भूस्खलन होऊन सुतारवाडीतील घरेही जमीनदोस्त झाली होती. तेव्हापासून या दरडग्रस्तांची घरासाठी वणण सुरु आहे.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या तब्बल सहा लाख रुपयांच्या विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून, दोघे फरार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग, अलिबाग आणि महाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विभागाच्या भरारी पथकाने दिविल गावातील एका बंद घरावर छापा टाकला.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
तळा | तळा-मांदाड रस्त्यावर एका भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. ही धडक इतकी भीषण होती की एसटीचा मागचा भाग अक्षरशः चिरला गेला. याप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोलापूर | राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री बनवा या मागणी चक्क सोलापूर जिल्ह्यातून मागणी करण्यात आली. एवढेच नाही तर त्यासाठी एका पदाधिकार्याने चक्क रक्ताने पत्र लिहिले आहे. रायगडमधील पालकमंत्री भरत गोगावले यांनाच मिळावे, यासाठी शिवसेना जोर लावून आहे.
नवी दिल्ली | रायगडच्या पालकमंत्रीपदाचा पेच दिल्ली दरबारी पोहचला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि भाजप नेते अमित शहा यांच्यातील चर्चेनंतर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली | स्वच्छ भारत मिशन, शहरी श्रेणीअंतर्गत आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’च्या सुपर लीगमध्येमध्य नवी मुंबई तिसर्या स्थानी आहे. इंदूर शहराने सलग आठव्यांदा देशातील सर्वांत स्वच्छ शहराचा पुरस्कार पटकावला. सुरत दुसर्या स्थानी आहे. मुंबईच्या कामगिरीत किंचित सुधारणा झाली असून शहराचा ३३ वा क्रमांक आला.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
सावंतवाडी | मागच्या वेळी मी त्यांना (दीपक केसरकर) मंत्रीपदाचा कोट दिला होता, आता तो त्यांनी मला दिला. राजकारण हे नशिबावर अवलंबून असते,अशी मिश्किल प्रतिक्रिया रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.
नवी मुंबई | आगामी जिल्हा परिषद, नगर पंचायत व महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक आढावा बैठक राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी कोंकण विभागात पार पडली.
मुंबई | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या लाखो गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे सरसावले असून, त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली देखरेख समिती नेमण्याचे निर्देश दिले आहेत. खड्ड्यांची तक्रार मिळताच २४ तासांत निराकारण करण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत.
मुंबई | महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी या वर्षीपासून ओएमआर प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.