पेण | पेण तालुक्यातील गडब गावातील तरुण मितेश जनार्दन पाटील याची अलिबाग समुद्रकिनारी हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ गडब ग्रामस्थांनी रविवारी, ८ डिसेंबरला कँडल मार्च काढून आपला रोष व्यक्त केला. मितेश पाटील आणि त्याचा मित्र अलिबागला जत्रेसाठीआले होते.
रात्री ते समुद्र किनार्यावर बिअर पीत बसलेले असताना, एकाच्या हातून बाटली खाली पडली. तिचा आवाज ऐकून शेजारी बसलेल्या आक्षी साखर येथील तरुणांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मितेश पाटील याचीहत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पेण गडबमध्ये खळबळ उडाली होती.
या घटनेच्या निषेधार्थ रविवारी गडब ग्रामस्थांनी कँडल मार्चचे आयोजन केले होते. या मार्चमध्ये हजारोच्या संख्येने नागरीकसहभागी झाले होते. यामध्ये महिला, तरुणांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. या कँडल मार्चमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे, माजी जिल्हा परिषद.