मुख्यमंत्री फडणवीस निवडणार मंत्र्यांची टीम

By Raigad Times    11-Dec-2024
Total Views |
 MUMBAI
 
मुंबई | विधानसभेचे निकाल लागल्यावर मुख्यमंत्री ठरायला आणि शपथविधीला १२ दिवस लागले. मात्र यानंतर चर्चा सुरु झाली आहे ती, मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार ? आणि कोणत्या खात्याची लॉटरी कुणाला लागणार? याची; पण या लॉटरीची तिकीटे आहेत स्वत: मुख्यमंत्री फडणवीसांच्या हातात.
 
पुढच्या ९६ तासांत टीम फडणवीस शपथ घेण्याची शक्यता आहे. फडणवीस त्यांच्या मंत्रिमंडळात काही नव्या चेहर्‍यांचा समावेश कऱणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. गेल्या पाच वर्षांत ज्या आमदारांची सार्वजनिक जीवनात कामगिरी सरस आहे अशा आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता असून काही ज्येष्ठ नेत्यांना संघटनेत परत पाठवले जाण्याची शक्यता आहे. फडणवीस विचारपूर्वक मंत्रिमंडळ सदस्यांची नियुक्ती करतील अशी चर्चा आहे.