रोहा | राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठीच्या अतिशय महत्त्वाची योजना आणली आहे. त्यामुळे आता ही योजना बंद करण्याचे कारण नाही किंवा योजना बंद करण्यासंदर्भात असा कोणताही शासन निर्णय झाला नाही, अथवा कोणतेही पत्रक काढलेले नाही.
त्यामुळे ही योजना सुरुच राहणार असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून योजना बंद करण्याचे मेसेज व्हायरल होत आहेत, त्यावर महिलांनी विेशास ठेवू नये असे आवाहन माजी मंत्री आ. अदिती तटकरे यांनी केले आहे. याबाबत रोह्यात गुरुवारी (दि.१२) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महाराष्ट्र राज्य महिला व बालकल्याण विभागाच्या माजी मंत्री तथा आमदार अदिती तटकरे यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेतील महिलांनी घाबरण्याची गरज नाही किंवा महिलांनी मनामध्ये कोणतीही शंका निर्माण करु नये. कोणतेही शासन निर्णय किंवा निकष या योजनेमध्ये बदल केलेले नाहीत. ना विभागाच्या माध्यमातून कोणतेही पत्र काढलेला आहे. मुख्यमंत्री लाडके बहीण योजना ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरुच राहील असे आ. अदिती तटकरे म्हणाल्या.