खारघरमध्ये वृद्धाला लुटले, रोकड लंपास

By Raigad Times    14-Dec-2024
Total Views |
 kharghar
 
पनवेल | खारघर उपनगरातील बँकेतून रोख रक्कम घेऊन घरी जाणार्‍या ग्राहकांना लुटण्याच्या दोन घटना महिन्याभरात घडल्या. यामुळे चोरट्यांनी बँक ग्राहकांना लक्ष्य केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पहिली घटना १३ नोव्हेंबरला घडली. यामध्ये सेटर १२ येथील कॅनरा बँकेतून ६९ वर्षीय वृद्ध दोन लाख रुपये घेऊन पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी रकमेची पिशवी हिसकावून तेथून पोबारा केला होता. दुसरी घटना मंगळवारी दुपारी बारा वाजता घडली.
 
सेटर ११ येथील साईशास्त्र सोसायटीत राहणारे ७२ वर्षीय वृद्ध सेटर १२ येथील स्टेट बँकेतून दोन लाख तीस हजार रुपयांची रक्कम घेऊन ते राहत असलेल्या इमारतीमध्ये प्रवेश करत असताना ३० ते ३५ वयोगटाचे दोन तरुण दुचाकीवर त्यांच्याजवळ आले. चोरट्यांनी पीडित वृद्धाच्या डोळ्यावर फटका मारुन त्यांना जमिनीवर पाडले आणि रोख रकमेची पिशवी पळविली.