अलिबाग । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या लँडस्लाईड यशानंतर महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी रविवारी (15 डिसेंबर) नागपुरात पार पडला. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 मंत्रिपदे आली आहेत. शिवसेनेच्या वाट्याला एकनाथ शिंदेंसह 12 मंत्रिपदे आली. तर राष्ट ्रवादीला अजित पवारांसह 10 खाती मिळाली.
यात रायगडला दोन मंत्रिपदे मिळाली असून, यामध्ये सवारच्या नजरा लागल्या होत्या त्या महाडचे आमदार भरत गोगावले यांनी शिवसेना शिंदे गटाकडून तर राष्ट्ररवादीकडून श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे यांनी सलग दुसर्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी रविवारी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधीचा सोहळा झाला.
समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्यांमध्ये रायगडातील महाडचे आमदार भरत गोगावले आणि श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे यांचा समावेश आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर सवारनाच मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले होते. त्यातूनच महाडचे आमदार भरत गोगावले यांना गेली पाच वर्षे मंत्रीपदाने हुलकावणी दिली होती.
त्यांच्या मंत्रिपदावरून अनेक वेळा त्यांची खिल्ली उडवून विरोधकांकडून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात होता. अखेर महायुतीच्या सरकारमध्ये पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांनी स्थान मिळवले असून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशना अगोदर झालेल्या मंत्रीमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. महाड विधानसभा मतदार संघातून आमदारकीचा चौकार मारणारे आमदार भरत गोगावले यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मरण करून मी भरतशेठ विठाबाई मारुती गोगावले असा उललेख करीत आपली मंत्रिपदाची शपथ घेतली.
त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महाड विधानसभा मतदार संघात महायुतीच्या कार्यकत्यारनी फटाके फोडून आपला आनंद साजरा केला. महाड शहरात सवारना नागपूर येथील शपथविधी सोहळा पाहता यावा यासाठी श्री राममंदीर चौक व श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठे स्क्रीन लावून थेट प्रक्षेपण दाखवण्यात येत होते. त्यामुळे आ. गोगावले हे मंत्रीपदाची शपथ घेत असताना महाडकर तो नजारा महाडमध्ये पाहू शकले.
महाड शहरातील कार्यकत्यारनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमून एकच जल्लोष केला. फटाक्याची आतषबाजी, गुलाल भंडार्याची उधळण करीत एकमेकांना पेढे भरवून त्यांनी हा आनंद साजरा केला. यानंतर शहरातील मुख्य बाजारपेठेतून बाईकरॅली काढण्यात आली.
शिवसेनेचे माजी आमदार कैलासवासी प्रभाकर मोरे यांच्यानंतर तब्बल 15 वर्षांनंतर पुन्हा एकदा महाड विधानसभा मतदारसंघात एखाद्या आमदाराने मंत्रिपद मिळविले असून अनेक वर्षांची ही प्रतीक्षा संपल्याने कार्यकर्ते व समर्थकांमध्ये आनंद व समाधान दिसून येत होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अदिती तटकरे यांनी सलग दुसर्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. महिला व बालकल्याण मंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात राबविलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रचंड यशस्वी ठरली. त्यामुळे सलग दुसर्यांदा त्यांना पक्षाकडून मंत्रिपद देण्यात आले आहे.