म्हसळा । म्हसळा शहरांत आणि तालुक्यांत गोवंश चोरीला जाणे, गोवंश हत्या, गोमास विक्री अशा घटना सातत्याने घडत असतानाच म्हसळा शहरांत शुक्रवारी, 13 डिसेंबर रोजी रात्री गोवंश चोरी, गोहत्या, मास विक्री साठी एकत्रित करणे अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य म्हसळा नवानगर परिसरांत सुरुअसल्याची फिर्याद सागर राजू विचारे या पोलीस कॉन्स्टेबलने दिली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांनी म्हसळा पोलीस ठाणे सीआरएनओ -120/2024 बीएनएस 125 3(5) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 5, 5(क) इत्यादी अन्वये गुन्हा दाखल केला आणि कहाळे यांनी तात्काळ ज्ञानेश्वर एडवळे, सुनिल रोहिणकर, हेडकॉन्स्टेबल बांगर, देवढे, बोंगणे, चितारे, हंबीर, घनश्याम पगार, ठाकरे या कर्मचार्यांसह व्यूहरचना करून घटनास्थळी तीन जणांना गोमास व अन्य असा 40 हजार 400 चा मुद्देमाल जप्त केला.
यामध्ये अफताब नुरहसन हुर्जुक वय-38 रा, म्हसळा नवानगर, बाबर हशिद शेख वय-27, राहुल सुभास शेख वय 22 यांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील बाबर आणि राहुल हे दोघे बंगाली आहेत. त्यांचे आधार कार्डसह पूर्णपणे व्हेरीफीकेशन होण्याची जनतेतून मागणी पुढे येत आहे.